Narendra Modi ek rahenge toh safe rahenge Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज (१८ नोव्हेंबर) प्रचाराचा शेवटचा दिवस असून, दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. मात्र, या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘हम एक है, तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या दोन घोषणांची बरीच चर्चा झाली. अशातच मंगळवारी विदर्भातील एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “लोकांची एकजूट राहिली नाही, तर काँग्रेस त्यांचे आरक्षणाचे फायदे हिसकावून घेईल. त्यामुळेच मी म्हणतो, ‘हम एक है, तो सेफ हैं’ (आपण एकत्र राहिलो, तरच सुरक्षित राहू)”. मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रचारसभेत ‘हम एक है, तो सेफ हैं’चा नारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी हा नारा सर्वप्रथम ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील केवडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिला होता.
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ घोषणेमागचा उद्देश काय? निवडणुकीत किती फायदा होणार?
Narendra Modi ek rahenge toh safe rahenge : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' अशी घोषणा दिली आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-11-2024 at 11:03 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiनिवडणूक २०२४Electionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi ek rahenge toh safe rahenge slogan decoding maharashtra assembly election 2024 asc