महेश सरलष्कर

अत्यंत विश्वासू मराठी भाषक नेते व गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत मुक्तकंठाने कौतुक केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पक्षाची ही पहिलीच बैठक होती. गुजरात विधानसभेतील अभूतपूर्व यशामुळे पाटील यांना भविष्यात केंद्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”
Rohit Pawar On Pune Guardian Minister
Rohit Pawar : पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार अजित पवार की चंद्रकांत पाटील? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “शंभर टक्के…”

गुजरात विधानसभेतील १८५ पैकी १५६ जागा जिंकून भाजपने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांचा १४९ जागा जिंकण्याचा विक्रमही मोडला. भाजपचे हे ऐतिहासिक यश मोदींच्या नेतृत्वामुळे मिळाले असल्याने बुधवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजपच्या खासदारांनी मोदींचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींचा सत्कार केला. या बैठकीला नवसारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सी. आर. पाटील देखील उपस्थित होते.

हेही वाचा… दक्षिणेत पिता- पूत्र मुख्यमंत्री व मंत्र्याची आणखी एक जोडी, स्टॅलिन पूत्र मंत्रिमंडळात

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील विजयाचे सगळे श्रेय भाजपच्या नेत्यांनी मोदींना दिले असले तरी, मोदींनी मात्र विक्रमी यशाचे श्रेय सी. आर. पाटील यांना दिले. पाटील यांचे संघटनात्मक कौशल्य आणि प्रदेश भाजपची संघटनात्मक ताकद या दोन्हीमुळे गुजरातमध्ये मोठे यश मिळाल्याचे मोदी म्हणाले, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर दिली.

हेही वाचा… राष्ट्रवादीतील नव्या पिढीच्या आशा पल्लवीत

या बैठकीत मोदींनंतर सी. आर. पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी सी. आर. पाटील यांचे जाहीरपणे कौतुक केल्यामुळे पाटील यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. गुजरातमधील निकालानंतर, पाटील यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली गेली होती. तसेच, त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा आगामी लोकसभा निवडणुकीतही उपयोग करून घेतला जाऊ शकतो. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सचिव व त्यानंतर महासचिवपद दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, सी. आर. पाटील यांची केंद्रातील बढती इतक्या झटपट होणार नाही. २०२४ नंतर पाटील यांना केंद्रीय स्तरावर व्यापक जबाबदारी दिली जाऊ शकेल, असे भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत

भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक दर मंगळवारी घेतली जाते, नियोजित वारीच ही बैठक घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली जाणार असल्याने मंगळवारी पक्षाची बैठक अचानक रद्द केली गेली. मात्र, पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशाच्या आर्थिक स्थितीसंदर्भात सादरीकरण केले. ‘जी-२०’ परिषदेच्या अध्यक्षपदाच्या ‘सोहळ्या’त देशवासीयांना सहभागी करून घेण्याचे आवाहन मोदींनी खासदरांना केले.

Story img Loader