हिमाचाल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाने येथे प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील मंडी भागातील पड्डल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या युवा विजय संकल्प रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी मोदी यांनी हिमाचल प्रदेशला ‘दुसरे घर’ म्हणत भाजपाच्या प्रचार मोहिमेचा श्रीगणेशा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते. मात्र पावसामुळे मोदी येथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी या रॅलीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी बोलताना मागील अनेक दशकांपासून देशाला स्थिर सरकार मिळालेले नव्हते. तसेच कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. एखादे सरकार किती काळ टिकेल याची कोणालाही माहिती नव्हती. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशसहीत देशभरातील जनतेने देशात स्थिर सरकार यावे म्हणून मतदान केले, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> नरेंद्र मोदींना दिलेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिमाचल प्रदेश सरकारने आतापर्यंत तेथे काय-काय केले याबाबतची माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली. केंद्र तसेच राज्य सरकार यांच्यात समन्वय असल्यामुळे योजना ठरवणे तसेच सुप्रशासन सोपे झाले. हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्रय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. हा निधी आधीच्या सरकारने दिलेल्या निधीच्या सात पट अधिक आहे. हिमाल प्रदेशमधील जनतेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. भाजपामधील युवा कार्यकर्ते आपल्या कामातून देशासमोर एक उदाहरण ठेवत आहेत. येथे मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, खासदारांपर्यंत सगळे तरुण आहेत, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> त्रिपुरात भाजपामध्ये गळती सुरूच; आणखी एका आमदाराचा राजीनामा

दरम्यान, या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष हजेरी लावू शकले नाहीत. मात्र आगामी काळात हिमाचल प्रदेशला नक्की भेट देणार, असे आश्वासन मोदी यांनी या सभेला संबोधित करताना दिले. हिमाचल प्रदेशमध्ये १९९० सालापासून कोणत्याही पक्षाला पुन्हा सरकार स्थापता आलेले नाही. प्रत्येक निवडणुकीत येथे सत्ताबदल झालेला आहे. याच कारणामुळे येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.