नवीन पटनायक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर अबू धाबीमधील शेख झायेद मशिदीत, आरामशीर, हसतमुख आणि फिकट निळ्या कुर्त्यामध्ये फिरतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर त्या पोस्टवरून राजकीय चर्चा सुरू झाल्या.अबू धाबीच्या ‘शेख झायेद’ मशिदीवरील संगमरवरी घुमट हे मोगल वास्तुकलेचे प्रतीक आहे यामध्ये नाजूक असे कोरीव काम केले आहे. या मशिदीवरील घुमटाला भव्यतेचे प्रतीक मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार ही मशीद बांधण्यासाठी कारागीर आणि संगमरवरी दगड देखील राजस्थानमधील मकराना गावातून आणण्यात आहे होते. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी १० दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या शेवटी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. गेल्या १० वर्षातील पटनायक यांचा हा पहीला परदेश दौरा होता. पटनायक यांना इतिहास आणि वारसा याविषयी प्रचंड आस्था आणि आवड असल्याचे त्यांच्या या दौऱ्यावरून स्पष्ट होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा