अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला महायुतीतील स्‍थानिक नेत्‍यांकडून होत असलेल्‍या विरोधाच्‍या पार्श्‍वभूमीवर या नेत्‍यांची उद्विग्‍नता दूर करून घटक पक्षांची एकजूट कायम राखण्‍याचे आव्‍हान राणा दाम्‍पत्‍याला पेलावे लागणार आहे. एकीकडे नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मात्र अद्याप मुहूर्त ठरलेला नाही. राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्‍या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यास सांगू, असा दम रवी राणांनी दिला आहे.

आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाचा मेळावा शनिवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील, तो एनडीएचा घटक पक्ष म्‍हणून आम्‍हाला मान्‍य असेल, असे मेळाव्‍यात जाहीर करण्‍यात आले. युवा स्‍वाभिमान पक्ष गेल्‍या १२ वर्षांपासून एनडीएचा घटक पक्ष आहे. या निवडणुकीतही आम्‍ही एनडीएसोबतच आहोत. नवनीत राणा या लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. आम्‍हाला काही महत्‍वाचे संकेत मिळाले आहेत. ते लवकरच सर्वांना माहीत होईल. या निवडणुकीत भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्‍ट्रवादी अजित पवार गट आणि इतर सहकारी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन नवनीत राणा यांच्‍या विजयासाठी प्रयत्‍न करतील, असा आशावाद रवी राणा यांनी मेळाव्‍यात बोलताना व्‍यक्‍त केला. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधात काम केल्‍यास कारवाई करण्‍यास सांगू, असा इशारा रवी राणांनी स्‍थानिक नेत्‍यांना दिला. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांकडून नवनीत राणा यांना कुठल्‍याही प्रकारचा प्रस्‍ताव आल्‍यास त्‍याला पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, असा ठराव युवा स्‍वाभिमान पक्षाने पारीत केला. यातून नवनीत राणांच्‍या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. पण, भाजपचे नेते याविषयी अजूनही स्‍पष्‍टपणे बोलण्‍यास तयार नाहीत.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

नवनीत राणांच्‍या उमेदवारीला मुख्‍य विरोध हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा आहे. आम्‍हालाच उमेदवारी मिळेल, असा दावा करीत अडसुळांनी दंड थोपटले आहेत. अमरावतीची जागा ही शिवसेनेची आहे. ती सोडण्‍याचा प्रश्‍नच नसल्‍याचे अडसूळ यांचे म्‍हणणे आहे. आनंदराव अडसूळ यांनी तर नवनीत राणांचा प्रचार करण्‍यापेक्षा राजकारण सोडू, असा थेट इशाराच दिला होता. त्‍यांचा विरोध मोडून काढण्‍यासाठी राणा यांना जोरकस प्रयत्‍न करावे लागणार आहेत. रवी राणा हे सातत्‍याने नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतात, स्‍थानिक भाजप नेत्‍यांना विश्‍वासात घेत नाहीत, अशीही एक तक्रार आहे. भाजपच्‍या अनेक नेत्‍यांसोबत रवी राणा यांचे खटके उडाले आहेत. त्‍यात भाजपचे शहराध्‍यक्ष आणि आमदार प्रवीण पोटे, महापालिकेचे माजी स्‍थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्‍यासह अनेक नेत्‍यांचा समावेश आहे. या नेत्‍यांची नाराजी दूर करण्‍यासाठी राणा यांना भरपूर परिश्रम घ्‍यावे लागणार आहेत.

हेही वाचा – जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोण याचा तिढा सुटेना

राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके आणि रवी राणा यांच्‍यातील संघर्ष अलीकडच्‍या काळात कमी झाल्‍याचे दिसून येत असले, तरी या दोन नेत्‍यांमधून कधीकाळी विस्‍तवही जात नव्‍हता, याचे अमरावतीकरांना विस्‍मरण झालेले नाही. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे महायुतीत असले, तरी रवी राणा आणि त्‍यांच्‍यात सख्‍य नाही. गेल्‍या दोन-तीन वर्षांत उभय नेत्‍यांमधील तुंबळ वाक् युद्ध जिल्‍ह्याने पाहिले आहे. थेट पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे नाव घेऊन महायुतीच्‍या स्‍थानिक नेत्‍यांना निवडणूक प्रचाराला जुंपता येऊ शकेल का, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात आता चर्चेला आला आहे. नवनीत राणा यांच्‍या जात प्रमाणपत्राविषयीचा निकाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने राखून ठेवला आहे. तो विरोधात गेल्‍यास राणांच्‍या अडचणी वाढणार आहेत. भाजपचे नेते त्‍यामुळे अत्‍यंत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. नवनीत राणा या भाजपच्‍या उमेदवार असतील की महायुतीचा त्‍यांना पाठिंबा राहील, याची उत्‍सुकता ताणली गेली आहे.