पुणेकरांना कायम दूरचा वाटणारा पण उपनगरांतील रहिवाशांना आपलासा वाटणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १९९९ मध्ये स्थापना झाल्यानंतर या पक्षाची पायामुळं खोलवर रुजण्यासाठी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि महापालिकांच्या प्रभागांच्या रचनेत बदल हे दोन हुकमी मार्ग या पक्षाने अवलंबलेले दिसतात. राज्यात असलेल्या सत्तेचा वापर करून आपल्या सोयीचे मतदारसंघ तयार करण्यावर या पक्षाने प्रारंभीच्या काळात भर दिला. समाविष्ट गावांचा परिसर हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा होता आणि आहे. त्यामुळे संबंधित भागाच्या जोरावर महापालिकेत शिरकाव करण्याचे धोरण या पक्षाने सुरुवातीच्या काळात राबविले. स्थापनेनंतर झालेल्या २००२ च्या महापालिका निवडणुकीत या पक्षाला फारसा प्रभाव टाकता आला नाही. मात्र, त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा पक्ष ४८ जागा घेत अल्पावधीत प्रथम स्थानावर जाऊन पोहोचला. अर्थात त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदौड सुरू होती. तोपर्यंत पुण्यावर माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे प्राबल्य होते. कलमाडी आणि अजित पवार यांच्यात सख्य नसल्याने कोणत्याही परिस्थितीत कलमाडींना महापालिकेच्या सत्तेवरून पायउतार करण्याचा ‘पण’ अजित पवार यांनी केलेला होता. त्यामुळे २००७ च्या निवडणुकीत कलमाडी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपशी हातमिळवणी केली आणि राजकारणातील ‘पुणे पॅटर्न’चा जन्म झाला. राष्ट्रवादीच्या ४८ जागा, शिवसेनेच्या २० आणि भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे ३६ नगरसेवक होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असूनही पुण्यात काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौरपद व स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा