एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेले माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांच्यावर आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांची सूत्रे राष्ट्रवादीने यापूर्वीच दिली असताना त्यांची राजकीय चलबिचलता कायम असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनी महेश कोठे यांचा लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट कोठे यांच्याच देखत केला आहे. या पार्श्वभूमीवर कोठे यांनीही आपली भूमिका बदलत, आगामी विधानसभा निवडणुकीत जो पक्ष आपणांस उमेदवारी देईल, त्या पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

mahavikas aghadi jode maro andolan marathi news
महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उपस्थिती
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Arvind Chavan, NCP, Ajit Pawar, Jalna Assembly Constituency, mahayuti, Shiv Sena, Arjun Khotkar,
जालन्यात अजित पवार गट आग्रही
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Appa Shinde Kalyan East area Kalsevadi drug shop stolen by thieves
कल्याणमध्ये माजी आमदाराच्या औषध विक्री दुकानात चोरी
jay pawar
बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार
amit Deshmukh Marathwada leadership marathi news
मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुख यांच्याकडे?

यापूर्वी अनेक वर्षे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे सहकारी म्हणून काम केलेले आणि महापालिकेची सूत्रे सांभाळलेले महेश कोठे हे २०१३ नंतर काँग्रेसमधून बाहेर शिवसेनेत प्रवेश केला होता. महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढवूनही आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. त्यामुळे राजकीय तगमग होऊन त्यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. पक्षात अधिकृतपणे प्रवेश न घेताही कोठे यांच्यावर पक्षाचे नेते शरद पवार यांनी आगामी महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कोठे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविली होती. त्यांनी काँग्रेसची काही ज्येष्ठ नेते मंडळींना राष्ट्रवादीत आणले होते.

हेही वाचा: वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?

राज्यात अचानकपणे राजकीय नाट्य घडून महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या पार्श्वभूमीवर महेश कोठे यांची भूमिका पुन्हा बदलली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपणांस विधान परिषदेवर पाठविण्याचा शब्द दिल्याचे कोठे यांचे सांगणे होते. विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा दारूण पराभूत झालेले महेश कोठे यांची आमदार होण्याची एकमेव महत्वाकांक्षा आहे. एकीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात कोठे यांचे काही मोजके समर्थक गेले तरी विधान परिषदेवर जाण्यास मुहूर्त लागत नसल्यामुळे कोठे हे राष्ट्रवादीतच पाय रोवून थांबले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांचा विश्वासही गमावल्यामुळे महेश कोठे यांना आगामी महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीत पूर्वीसारखा उत्साह राहिला नाही. शहरातील राजकारणात अलिकडे काही वर्षे केंद्रबिंदू म्हणून ओळखले गेलेले महेश कोठे हे मनाने राष्ट्रवादीत नाहीत, असे पक्षातच बोलले जाते.

हेही वाचा: नितीन कुंभलकर : उत्तम नियोजनकार

आपण सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरवूनच राष्ट्रवादीत कार्यरत आहोत. आमदार होण्याची आपली एकमेव इच्छा आहे. तेव्हा जो पक्ष आपणांस विधानसभेची उमेदवारी देईल, त्याच पक्षाकडून आपण निवडणूक लढविणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीत आपण शरद पवार यांच्या आदेशानुसार काम करीत असताना काहीजण आपली अडवणूक करीत आहेत. पक्षात सन्मानाची वागणूक मिळाली तर पवार यांच्या अपेक्षेप्रमाणे नेतृत्व करू, अशीही भूमिका कोठे यांनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तीन पक्ष फिरलेले महेश कोठे हे आता नक्की कोणाचे आहेत, याचे गूढ कायम राहिले आहे.