मोहनीराज लहाडे

नगरः राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नगरमध्ये आंदोलन छेडले. आंदोलन जरी ज्वलंत प्रश्नाबद्दल असले तरी त्या आंदोलनाचा रोख भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात असल्याचे लपून राहीले नाही. मतदारसंघाबाहेरचे प्रश्न मांडून, त्याचे नेतृत्व करत, आमदार लंके यांनी लढा उभारला. त्यातून त्यांनी भाजपचे खासदार विखे यांच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण सक्षम असल्याकडे लक्ष वेधून घेतले. ज्या मतदारसंघातून हे राष्ट्रीय महामार्ग जातात, त्या मतदारसंघाचे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील लोकप्रतिनिधी या प्रश्नावर यापूर्वी फारसे आक्रमक झालेले नाहीत. ती भूमिका आमदार लंके यांनी घेतली. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राचा परीघ लोकसभेच्या दक्षिण मतदारसंघापर्यंत व्यापला गेला. त्यातूनच त्यांनी विखेंविरुद्ध लोकसभा निवडणुकीत लढाई करण्यास आपण सिद्ध आहोत, हे नागरिकांच्या लक्षात आणून दिले आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Opposition boycotts MLAs oath taking ceremony in Assembly session Voting through EVMs alleged to have been rigged Print politics news
आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :…तर राष्ट्रपती राजवट लावली असती
MLA Jitendra Awhad allegations regarding assembly election voting machines thane news
मतदान यंत्रे हॅक केली नाही तर, त्यात छेडछाड केलीय; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाशिवाय हे घडणे अशक्य. तसाही राष्ट्रवादी काँग्रेस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवारीच्या शोधात होताच. प्रश्न एवढाच बाकी आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आ. लंके असतील की त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके? या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणारे आहे. त्यासाठी काही अवधी जाऊ द्यावा लागणार आहे.

हेही वाचा: संसदीय पक्षाच्या बैठकीत विश्वासू सी. आर. पाटील यांचे मोदींकडून मुक्तकंठाने कौतुक

पारनेर-नगर हा राष्ट्रवादीचे आमदार लंके यांचा मतदारसंघ. त्याचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. नगर दक्षिणचे प्रतिनिधित्व भाजपचे खासदार विखे करतात. आ. लंके यांनी पूर्वीपासून खा. विखे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातून दोघांत आणि त्याच्या समर्थकांत आरोप-प्रत्यारोप रंगले होते. या सर्वातून विखेंच्या विरोधातील चेहरा म्हणून स्वतःला पुढे आणण्यास आ. लंके यांनी सुरुवात केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे समर्थक असणारे जिल्ह्यात वेगवेगळे चेहरे दिसतात. मात्र एकाच वेळी या तिन्ही नेत्यांची अनुकूलता मिळवणारा आ. लंके यांचा जिल्ह्यातील एकमेव चेहरा मानला जातो.

नगर-पाथर्डी-नांदेड व नगर-शिर्डी -कोपरगाव या दोन्हीही रस्त्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. हे रस्ते वाहतुकीसाठी लायक नाहीत. जनमानसाच्या भावना त्याबद्दल तीव्र होत्या. त्यामुळे आ. लंके यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेसह आप, वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. या दोन्ही रस्त्यांबद्दल भाजप खासदार विखे यांनी वेळोवेळी आश्वासने दिली होती. त्यामुळे आंदोलनातील बहुतांशी वक्त्यांचा रोष खासदार विखे यांच्या विरोधात व्यक्त झाला. विखेंच्या विरोधात उभ्या राहिलेल्या या व्यासपीठाचा, लढ्याचा त्यांचे परंपरागत विरोधक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही उपयोग करून घेतला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदारांनी, नेत्यांनी आ. लंके यांच्या उपोषणाला भेट देत, त्यांना पाठिंबा देत विखे पितापुत्रांवर जोरदार टीकाश्र सोडले. उपोषणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यात विखे विरुद्ध इतर सर्व असे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: दक्षिणेत पिता- पूत्र मुख्यमंत्री व मंत्र्याची आणखी एक जोडी, स्टॅलिन पूत्र मंत्रिमंडळात

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मध्यस्थीने चौथ्या दिवशी आमदार लंके यांनी उपोषण सोडले. उपोषण सोडताना मात्र पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार विखे यांच्याबद्दल मौन ठेवले, दुसरीकडे थेट केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधत आ. लंके यांना हव्या असलेल्या महामार्गांसाठी आश्वासन मिळवले. त्यातून केवळ नगर-पाथर्डी-नांदेड या महामार्गाचे काम तातडीने मार्गी लागेल. नगर-शिर्डी-कोपरगाव या रस्त्याच्या कामास ठेकेदार नियुक्तीस फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे तर नगर-चापडगाव-करमाळा-टेंभूर्णी या रस्त्याच्या कामासाठी कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.

चार दिवसांच्या उपोषणनंतर मागण्या सोडवण्यात आ. लंके यांना पूर्णतः अनुकुलता लाभली नसली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मात्र त्यांनी वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी संपर्क करून लंके यांच्या वातावरण निर्मितीस पाठबळ दिले. मात्र ज्या नगर शहरात लंके यांनी उपोषण केले तेथील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अजित पवार यांच्या भेटीचा अपवाद वगळला तर उपोषणस्थळी फिरकलेही नाहीत. खा. विखे व आ. जगताप यांच्यातील राजकीय मैत्रीचा हा परिणाम असावा.

हेही वाचा: राष्ट्रवादीतील नव्या पिढीच्या आशा पल्लवीत

ज्यांच्या डोक्यात चोवीस तास राजकारणाचा विषय असतो असेच लोक मतदारसंघाबाहेरची समस्या म्हणून शंका उपस्थित घेतात. परंतु आम्ही समाजकारण करणारे आहोत, विधिमंडळाचा सदस्य म्हणून राज्याचे प्रश्न मांडले जातात. नगर-शिर्डी- कोपरगाव रस्त्याचा काही भाग माझ्या मतदारसंघात येतोच. पाथर्डीतील मोहटादेवी हे माझे श्रद्धास्थान आहे. देवदर्शनासाठी आठवड्यातून दोन दिवस तरी मी तेथे जात असतो. केवळ राष्ट्रवादीच्या मतदारसंघापुरती रस्त्यांची समस्या मर्यादित नाही तर ती सर्वसामान्यांशी निगडित आहे. शिवाय या प्रश्नावर काँग्रेस, शिवसेना, आप वंचित बहुजन आघाडी, मनसे यांनीही पाठिंबा दिला आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. -नीलेश लंके, आमदार.

Story img Loader