पिंपरी : आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना एकेका‌ळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दोन महिन्यांपासून शहराध्यक्षाविना आहे. शहराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कधीकाळी शहराध्यक्षपद मिळवण्यासाठी रस्सीखेच असलेल्या राष्ट्रवादीत आता मात्र शहराध्यक्ष पद घेण्यास कोणी तयार होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> बसपचा आघाडीचा पर्याय खुला अन्यथा सर्व जागा लढविणार

A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तर माझ्या बरोबर कुणीही काम केलं नसतं”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

बारामतीखालोखल पिंपरी-चिंचवड शहरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व होते. सलग १५ वर्षे महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. ‘दादा बोले आणि प्रशासन डोले’ अशी परिस्थिती होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला मोठे महत्व होते. या पदासाठी रस्सीखेच होत असे. अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतल्यानंतर संपूर्ण शहर कार्यकारिणी त्यांच्यासोबत राहिली. परंतु, लोकसभेला राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर राजकीय भवितव्यासाठी शहराध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित गव्हाणे यांनी १६ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा >>> मुंबईत लोकसभा, पदवीधर, शिक्षकपाठोपाठ अधिसभेवरही ठाकरे गटाचे वर्चस्व

पक्षाची पडझड रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ माजी नगरसेवकांची बैठक घेतली. शहरात येत मेळावाही घेतला. अध्यक्षपदासाठी काही नावे आली आहेत. त्यांपैकी कोणाला अध्यक्ष करायचे याची चाचपणी करत असून, लवकरच अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल, असे सांगितले. मात्र, त्याला अडीच महिने पूर्ण होत आले. परंतु, अद्याप शहराध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. शहराध्यक्षपदासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, जगदीश शेट्टी, नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांची नावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविल्याचे सांगितले जाते. त्यांपैकी बनसोडे विधानसभा लढणार असून, बहल यांना राज्यपालनियुक्त आमदारकी देण्याची मागणी आहे. तर, काटे, भोईर हे चिंचवडमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळेच त्यांनी शहराध्यक्षपद स्वीकारले नसल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाही शहराध्यक्ष निवडला जात नसल्याने पदाधिका-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. कर्णधारच नाही तर लढायचे कोणाच्या नेतृत्वाखाली अशा बोलक्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.

हेही वाचा >>> ‘लाडक्या बहिणींना देण्यात येणारा पैसा जनतेचा’

पिंपरी-चिंचवडची जबाबदारी पार्थ पवारांकडे?

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांना राज्यात लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र पार्थ यांच्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिल्याचे दिसते. कारण, पार्थ हे सातत्याने शहरात येऊन संघटनेचा आढावा घेत आहेत. गणेशोत्सवातही शहरातील सर्व मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. शहराध्यक्ष एक पद असून आमचे सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष असल्या सारखेच असल्याचे पार्थ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

Story img Loader