गणेश यादव

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटपाचे धोरण निश्चित झाले असल्याचे सांगितले जात असतानाच मावळ लोकसभा मतदार संघावरून महायुतीत चढाओढ दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार असलेल्या मावळमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याचे सांगत अजित पवार गटाने दावा ठोकला. भाजपनेही तयारी असल्याचे सांगितले. त्यामुळे मावळच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. तर, आमदार सुनील शेळके यांच्या आडून पार्थ पवारांसाठी जुळवाजुळव केली जात असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
genelia deshmukh shares her opinion on parenting
रितेशची बाबा म्हणून जबाबदारी, मातृत्व अन् मुलांचे संस्कार; जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य, देशमुखांची सून म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Ajit Pawar
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”

लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवसेनेचे मावळवर वर्चस्व आहे. सलग तिसऱ्यावेळी शिवसेनेचा खासदार आहे. तिन्हीवेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारून भगवा फडकाविला. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षात फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत महायुतीत आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे यांच्यासोबत आहेत. मावळात शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा भाजप, राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पिंपरी, मावळमध्ये राष्ट्रवादीचे तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल, चिंचवडला भाजपचे आमदार असून उरणचे अपक्ष आमदार भाजपशी संलग्न आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा केवळ कर्जतमध्ये आमदार आहे.

हेही वाचा… प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात पक्ष बळकटीसाठी शरद पवार गटाची धडपड

या राजकीय ताकदीच्या जोरावर आता अजित पवारांच्या गटाकडून जागेवर दावा आणि भाजपकडून लढण्याची तयारी दर्शविली जात आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून मावळमध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. ही आकडेवारी लेखी स्वरुपात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देणार असून मावळची जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ठणकावून सांगितले. तर, भाजपच्या बाळा भेगडे यांनी जर पक्षाने लढ म्हणून सांगितले. तर, माझ्यापेक्षा माझे कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत, असे सांगत तयारी दर्शविली. दुसरीकडे खासदार बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले आहे. तिन्ही पक्ष मावळमधून लढण्याच्या तयारीत असल्याने महायुतीत पेच वाढला आहे. यातून कसा तोडगा काढला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… शिंदे गटाकडे असलेल्या कर्जत-खालापूर मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा, जोरदार शक्तिप्रदर्शन

गेल्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला होता. बारणे यांनी थेट पवार घराण्यावर हल्ला केला होता. त्याची सल अजितदादांच्या मनात दिसते. भाजपसोबत असल्याने पार्थचा दिल्लीचा मार्ग सुकर होईल, असा होरा आहे. आमदार शेळकेंनी आपण लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेळकेंच्या आडून पार्थसाठी जुळणी केली जात असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.