केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षावरही अशीच कार्यवाही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान किती पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता? निवडणूक झाल्यानंतर किती पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेण्यात आला? यावर नजर टाकू या.

पहिल्या निवडणुकीच्या अगोदर १४ राष्ट्रीय पक्ष

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अहवालानुसार देशातील पहिल्या निवडणुकीच्या अगोदर १४ राष्ट्रीय पक्ष होते. यामध्ये ऑल इंडिया भारतीय जनसंघ, बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), द फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी), फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर गट), अखिल भारतीय हिंदू महासभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, कृषीकर लोक पार्ट, भारतीय क्रांतिकारी कम्युनिष्ट पार्टी, अखिल भारतीय रामराज्य परिषद, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, समाजवादी पक्ष या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती.

Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah Rally cancle
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Ambernath Vanchit Bahujan Aghadi, Ambernath,
वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित

निवडणुकीनंतर चार पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला

मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यांपैकी फक्त चार पक्षांचाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. निवडणुकीनंतर १९५३ साली काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष (सोशालिस्ट पार्टी, किसान मजदूर संघाच्या विलीनीकरणानंतर हा पक्ष स्थापन झाला.) सीपीआय, जनसंघ या चार पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला.

२९ पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केली होती

याबाबत निवडणूक आयोगाच्या ‘लिप ऑफ फेथ- जर्नी ऑफ इंडियन इलेक्शन्स’ या पुस्तकात सविस्तर लिहिलेले आहे. “निवडणुकीच्या आधी एकूण २९ पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मात्र यातील १४ पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीच्या निकालानंतर ६ फेब्रुवारी १९५३ रोजी फक्त चार पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली,” असे या पुस्तकात म्हटलेले आहे.

निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेऊन निर्णय

दरम्यान, भारताच्या राजकारणात आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व नष्ट झालेले आहे. तर काही पक्षांचे विलीनीकरण झालेले आहे. सीपीआय पक्षाचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. सीपीआयची २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

पक्षाला दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा दिली जाते

सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी, सीपीआय (मार्क्सवादी), बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी या सहा पक्षांचा यात समावेश आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर बरेच फायदे मिळतात. यामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास पक्षाचे निवडणूक चिन्ह राखीव ठेवले जाते. तसेच पक्षाला दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा दिली जाते.