Jayant Patil On Ajit Pawar : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीच्या तासगावमध्ये झालेल्या एका सभेत कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भात माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्याबाबत भाष्य केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (एसपी) एक महत्त्वाची परीक्षा आहे. कारण पक्षात झालेल्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखतीत भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून असलेले मतभेत, मराठा आंदोलन आणि अजित पवारांच्या कथित सिंचन घोटाळ्यावरील विधानांवरही जयंत पाटील यांनी भाष्य भाष्य केलं आहे.

Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Lakhan Malik
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”
defamation case, Medha Somayya, Sanjay Raut,
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेले अब्रुनुकसानीचे प्रकरण : संजय राऊत यांची शिक्षा स्थगित, जामिनही मंजूर
ajit pawar
राजापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित यशवंतराव शिवसेना ठाकरे गटात दाखल
uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
many office bearers return to Sharad Pawar group by leaving Ajit Pawar group in Kalwa-Mumbra
क‌ळवा-मुंब्र्यात अजित पवार गटाला धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटात वापसी

हेही वाचा : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

जागावाटपावरील मतभेदामुळे महाविकास आघाडीला फटका बसेल का?

यासंदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, “जागावाटपाच्या चर्चेदरम्यान प्रत्येक पक्षाने आपली मते मांडली. आम्ही त्या सूचनांमधून सर्वोत्तम पर्याय निवडले. पाच-सहा जागांवर आमच्या नेत्यांमध्ये मतभेद झाले. मात्र, आम्ही त्याची काळजी घेतली. यामुळे महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही.”

दोन महिन्यांत तुम्ही महाराष्ट्रभर फिरलात. मग या निवडणुकीत खरे मुद्दे काय?

यावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, “आमच्या पक्षात फूट पडली असली तरी आम्हाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महागाई, शेतीविषयक समस्या आणि शेतीविषयक धोरणांमुळे लोक संतप्त आहेत. सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तसेच महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यातच भर म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आर आर पाटील यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे मतदारांमध्ये अधिक संताप निर्माण झाला आहे.”

दरम्यान, अजित पवार यांच्यावर भाजपाने ७० हजार कोटींच्या सिंचनाचा घोटाळ्यासंदर्भातील आरोप केले होते. याबाबत काही दिवसांपूर्वी अजित पवारांची सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघात सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात झालेल्या आरोपाबाबत भाष्य केलं. त्या सिंचन घोटाळ्यासंदर्भातील एका फाईलवर आर.आर.पाटील यांची स्वाक्षरी होती, त्यामध्ये खुल्या चौकशीची शिफारस करण्यात आली होती, असा आरोप अजित पवारांनी केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, “हे पाहून मी खूप अस्वस्थ झालो होतो. कारण आर आर पाटील हे माझे जवळचे सहकारी होते.”

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करताना म्हटलं की, अजित पवारांनी हे बोलून देवेंद्र फडणवीस यांना आणखी अडचणीत आणलं आहे. त्यातून फडणवीस यांची कार्यशैली तसेच गेल्या दहा वर्षांतील दोघांचे संबंधही समोर आले. त्यात भर म्हणजे अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये अधिक संताप निर्माण झाला. त्यांनी (देवेंद्र फडणवीस) विरोधी पक्षनेत्यांना फाईल दाखवली असती तर समजू शकलो असतो. पण ते (अजित पवार) फक्त विरोधी आमदार होते. तसेच तुम्ही (देवेंद्र फडणवीस) विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांची चौकशी केली. तसेच आर.आर.पाटील यांच्यावर आरोप करणारी फाइल दाखवली. याचा अर्थ तेव्हापासून आमचा पक्ष फोडण्यासाठी खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू होते का? दुसरे म्हणजे फाईल दाखवून अजित पवार यांना १० वर्षे ब्लॅकमेल करण्याचं काम सुरु होतं का? कारण अजित पवारांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? हे दिसून येतं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबरोबरच आर.आर.पाटील यांचे नाव त्यांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी निवडणुकीच्या प्रचारात घेण्यात आले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्वांनी अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आम्ही अजित पवार यांच्याबाबत वाईट बोलत नाहीत. आता आर.आर.पाटील यांच्याबाबत बोलणं हे चुकीचं आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : भाजप आणि एमआयएम ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणत प्रचारात समानपातळीवर

तुम्ही निवडणूक जिंकल्यास आश्वासने काय असतील?

या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल. आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेती मालाच्या किंमतीविषयी निधी तयार करण्याचा विचार करत आहोत. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला मदत देण्याचा विचार करत आहोत. तसेच महागाई रोखणे आणि महिलांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं.

मराठा आंदोलन आणि ओबीसींमधील संतापाचा मविआवर परिणाम होईल का?

यावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. आम्ही मराठा आणि ओबीसी यांच्यातील वादाच्या विरोधात आहोत. पण प्रत्येकाला योग्य हक्क मिळायला हवेत. स्थानिक परिस्थितीच्या आधारे लोक मतदान करत असल्याने त्याचा (मराठा आरक्षणाच्या मागणीचा) काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. मात्र, ज्यांनी आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यांच्याविरुद्ध जनता नक्कीच संताप व्यक्त करेल, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का दिला नाही?

महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का दिला नाही? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात ही परंपरा नाही. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा विचार करण्याऐवजी महाविकास आघाडीला बहुमत मिळवणं महत्वाचं आहे.”

सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार का?

महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार का? यावर जयंत पाटील म्हणाले, “आवश्यक नाही. पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता अधिक महत्त्वाची आहे. आम्ही मोठ्या संख्येने महिला उमेदवारही उभे केले आहेत. शेवटी क्षमता महत्त्वाची असते. पहिली पायरी म्हणजे बहुमत मिळवणे हे आहे”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.