संतोष प्रधान

काँग्रेसच्या घराणेशाहीवर नेहमीच नाके मुरडणाऱ्या भाजपनेही घराणेशाहीत आपणही मागे नाही हे कर्नाटकात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्राला प्रदेशाध्यक्षपदी नेमून दाखवून दिले आहे. मतांच्या राजकारणासाठी भाजपलाही घराणेशाहीचाच आधार घ्यावा लागला आहे.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी विजेयंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. पहिल्यांचा आमदारपदी निवडून आलेले विजेयंद्र हे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र आहेत. गेल्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला. पक्षाला सत्ता गमवावी लागली. तेव्हापासून पक्षातील गटबाजीवर मात करता आलेली नाही. गेल्या सहा महिन्यांत भाजपला विरोधी पक्षनेत्याची निवड करता आलेली नाही. ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा निकष लावून भाजपच्या नेतृत्वाने येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदावरून गच्छंती केली. तेव्हापासून भाजपची कर्नाटकात पिछेहाट सुरू झाली होती. बसवराज बोम्मई यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले पण त्यांच्या कारभारावर टीकाच अधिक झाली. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपच्या नेतृत्वाला राज्यात जनाधार असलेल्या येडियुरप्पा यांचीच मदत घ्यावी लागली आहे. येडियुरप्पा यांच्या मुलाची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असली तरी पक्षाचा सारा कारभार येडियुरप्पा यांच्या कलाने चालेल हेच पक्षाने अधोरेखित केले.

हेही वाचा… Telangana : ‘विसरू नका, काँग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला’, केसीआर यांची टीका

काँग्रेसमधील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सततच टीकाटिप्पणी करीत असतात. परिवारवाद आणि एका परिवाराचा पक्ष म्हणून भाजपकडून काँग्रेसला नेहमी हिणवले जाते. काँग्रेसमध्ये कोणीही महत्त्वाच्या पदावर जाऊ शकत नाही. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ताही अध्यक्षपदी नेमला जातो, असा उल्लेख भाजपच्या नेतृत्वाकडून केला जातो. असे असले तरी कर्नाटकात भाजपला घराणेशाहीची मदत घ्यावी लागली आहे.

घराणेशाहीवर शिर्षस्थ नेत्यांकडून नाके मुरडली जात असली तरी भाजपमध्ये घराणेशाही काही कमी नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सासूबाई मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या खासदार व आमदार होत्या. कॅबिनेटमंत्री अनुराग ठाकूर यांचे वडिल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र खासदार होते. मनेक गांधी आणि वरुण गांधी ही आई आणि मुलाची जोडी खासदारपदी आहेच. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांनी आमदारकी भूषविली. अशी अनेक उदाहरणे आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे मनोमिलन, दोन्ही नेत्यांचे कायर्कर्ते मात्र अस्वस्थ

महाराष्ट्रात भाजयुमोच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या दोन कन्या पंकजा व प्रीतम या महत्त्वाच्या पदांवर आहेत. कै. प्रमोद महाजन यांची कन्या पुनम या खासदार आहेत. पक्षाच्या अनेक खासदार व आमदारांची मुले स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय आहेत. भाजपने काँग्रेसच्या धराणेशाहीवर कितीही नाके मुरडली तरीही भाजपमध्येही घराणेशाही काही कमी नाही. कर्नाटकमधील नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीने ती अधिकच स्पष्ट झाली.

‘भाजपमध्ये घराणेशाही नाही, असा दावा भाजपकडून केला जातो. पण कर्नाटकात काय चित्र आहे, असा सवाल कर्नाटक काँग्रेसने केला आहे. ‘ भाजपच्या कौटुंबिक राजकारणाचे कर्नाटक हे उदाहरण आहे’ अशी प्रतिक्रिया अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी केली आहे.

Story img Loader