Arvind Kejriwal In Delhi Assembly Election 2025 : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांत बिगूल वाजणार आहे. यासाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीसह भाजपा आणि काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे. गेल्या वेळी विजयाची हॅट्ट्रीक करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासमोर यावेळी सत्ता राखण्याचे आव्हान तर आहेच. पण, यावेळी त्यांना नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे पुत्र संदीप दिक्षित आणि दुसरे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा यांच्याशी सामना करावा लागणार आहे.

रविवारी आम आदमी पार्टीने त्यांची शेवटची उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये पक्षाने नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे येथून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे चिरंजीव संदीप दिक्षित यांना तिकिट दिले आहे. तर भाजपाने त्यांचे उमेदवार अद्याप जाहीर केले नसले तरी, पक्षाने परवेश वर्मा यांना या मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. परवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
uddhav devendra Fadnavis
“तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचं संयमी उत्तर ऐकून शिवसेनेची सारवासारव
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : “एक तर तू राहशील किंवा मी राहिन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
News About Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचं उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सगळ्यांनी…”

महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ

नवी दिल्ली मतदारसंघा राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा मानला जातो. कारणे याच मतदारसंघात संसद भवन आहे. त्याचबरोबर येथे परदेशी मिशन आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. या मतदारसंघाने आतापर्यंत अनेकांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले आहे. हा विधानसभा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आला आहे. तर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ १९५१ पासून अस्तित्वात आहे.

“एक दिल्ली का बेटा और दो सीएम के बेटे”

आम आदमी पार्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष लवकरच “एक दिल्ली का बेटा और दो सीएम के बेटे” अशी प्रचार मोहिम सुरू करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, “केजरीवाल आठवड्याचे शेवटचे दिवस त्यांच्या मतदारसंघासाठी राखीव ठेवून मतदारांशी संपर्कात असतात. केजरीवाल जेव्हा शक्य असेल तेव्हा मतदारसंघातील वाढदिवस, लग्न आणि स्थानिक क्रीडा स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहतात. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आल्यापासून, ते म्हणतात की, या लोकांनीच मला विजयी केले आहे.”

मतदारसंघावर केजरीवालांची पकड

२०१३ पासून केजरीवाल यांनी या जागेवर पकड निर्माण केली आहे. त्यांच्या पदार्पणाच्या निवडणुकीत, त्यांनी शीला दीक्षित यांना पराभूत करत ५४ टक्के मते मिळविली होती. तर दोन वर्षांनंतर मुदतपूर्व निवडणुकीत त्यांनी ६४ टक्के मते मिळवून काँग्रेसच्या किरण वालिया आणि भाजपच्या नुपूर शर्मा यांचा पराभव केला होता. २०२० मध्ये, त्यांची मतांची टक्केवारी ६१ टक्क्यांवर घसरली होती.

संदीप दिक्षित मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, “संदीप दीक्षित हे पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा होते. दोनदा लोकसभा निवडणूक जिंकणारे आणि शीला दीक्षित यांचा मुलगा म्हणून त्यांचा वारसा असणारे संदीप दिक्षित आमदार होण्यासाठी निवडणूक लढवत आहेत असे मानणे चुकीचे ठरेल. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.”

हे ही वाचा : “प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केले असते तर…”, २०१२ साली काँग्रेसवर आलेल्या संकटावर मणिशंकर अय्यर काय म्हणाले?

परवेश वर्मांना पंतप्रधानांचा आशीर्वाद

दुसरीकडे परवेश वर्मा यांना भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारले होते, परंतु केजरीवाल आणि संदीप दीक्षित यांच्याविरुद्धच्या लढाईसाठी त्यांना “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आशीर्वाद” मिळाल्याचे समजते. या निवडणुकीसाठी भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.

“या महिन्याच्या सुरुवातीला, पंतप्रधानांनी स्वतः परवेश यांच्याशी फोनवर चर्चा करत केजरीवाल यांना हटवण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. भाजपाने अद्याप अधिकृतपणे उमेदवार जाहीर केले नसले तरी त्यांना नवी दिल्लीतून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे”, असे भाजपामधील एका सूत्राने सांगितले.

Story img Loader