लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार नीलेश लंके एकदा नव्हे, तर तब्बल दोनदा जिंकले आहेत, असे म्हणता येईल. त्यांचा पहिला विजय झाला तो ४ जून रोजी, जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर त्यांनी भाजपाचे मातब्बर उमेदवार सुजय विखे-पाटील यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव केल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा दुसरा विजय मंगळवारी (२५ जून) झाला. पहिल्यांदाच लोकसभेची पायरी चढलेल्या नीलेश लंके यांनी लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामधील शपथविधीमध्ये ‘आय, नीलेश ज्ञानदेव लंके…’ असे म्हणत संपूर्णत: इंग्रजीतून शपथ घेतली. त्यांची ही कृती वरकरणी साधी वाटत असेल; पण त्यामागे एक मोठा विजय आहे. नीलेश लंके यांनी इंग्रजीमधून घेतलेल्या शपथेचे हे शब्द अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निनादले नसते, तरच नवल! कारण- अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारामध्ये इंग्रजी येण्याचा मुद्दा चर्चेस कारण ठरला होता. नीलेश लंके यांच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे-पाटील हे एका मातब्बर राजकीय कुटुंबातून येतात. त्यांनी प्रचारादरम्यान नीलेश लंके यांची खिल्ली उडविताना म्हटले होते की, लंके यांना ना इंग्रजी येते ना हिंदी!

हेही वाचा : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी झाली निवडणूक; याआधी अशी निवडणूक कधी झाली आहे?

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Sangli, Congress, Sharad Pawar group,
सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासूनच कुरघोड्या सुरू
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

सुजय विखे-पाटील एवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांनी माध्यमांद्वारे लंके यांना खुले आव्हानही दिले होते. एक व्हिडीओ माध्यमामध्ये प्रसारित करीत त्यांनी म्हटले होते, “जर ते (लंके) एवढेदेखील (व्हिडीओमध्ये आहे तसे) हिंदी अथवा इंग्रजी बोलू शकले, तर मी माझी उमेदवारी मागे घेईन.” हे आव्हान स्वीकारलेल्या नीलेश लंके यांनी आपल्या संसदीय कारकिर्दीची सुरुवातच इंग्रजीमधून शपथ घेत केल्याने चर्चेला उधाण आले आहे. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नीलेश लंके म्हणाले, “या जगामध्ये अशक्य असे काहीही नाही. कुणीही विशेष क्षमता घेऊन जन्माला आलेले नाही. पाण्यात टाकले की, प्रत्येकाला पोहायला येतेच. मीही तसाच आहे.” नीलेश लंके (वय ४४) म्हणाले की, प्रचारादरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक विखे-पाटील यांच्या टोमण्यांना प्रतिसाद न देणे पसंत केले. “त्यावेळी मी कुणालाही प्रतिक्रिया दिली नाही. उलट मी हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मी लोकांनाच विचारले की, तुम्हाला तुमच्यासाठी काम करणारा खासदार हवा आहे की इंग्रजी बोलणारा? लोकांनी त्यांच्याऐवजी मला निवडले”, असेही लंके म्हणाले. अहमदनगरमध्ये नीलेश लंके आपल्या शब्दांतून बोलण्याऐवजी कृतीतून बोलणे अधिक पसंत करतात, असे म्हटले जाते. मात्र, त्यांचा विजय एकट्याचा नसून त्यामागे शरद पवारांची ताकद उभी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. शरद पवार आणि विखे-पाटील कुटुंब यांच्यामधील राजकीय वैमनस्य चार दशकांपासूनचे आहे. सुजय विखे-पाटील हे या घराण्यातील राजकारणात असलेले चौथ्या पिढीतले सदस्य आहेत.

विखे-पाटील हे कुटुंब खरे तर काँग्रेसशी एकनिष्ठ होते. मात्र, आता या कुटुंबाने भाजपाशी संधान बांधले आहे. विखे-पाटील यांचे राजकीय साम्राज्य संपूर्ण अहमदनगरमध्ये पसरले आहे. अनेक सहकारी, तसेच शैक्षणिक संस्था या विखे-पाटील कुटुंबाच्या ताब्यात आहेत. सुजय विखे-पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या राज्याचे महसूलमंत्री आहेत. दुसऱ्या बाजूला नीलेश लंके यांचा जन्म कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका प्राथमिक शिक्षकाच्या पोटी झाला. नीलेश लंके यांनी त्यांच्या मूळ गावी चालविलेले एक छोटेसे हॉटेल बंद पडल्यानंतर ते राजकारणात आले आणि अगदी लहान वयातच त्यांनी शिवसेनेत (तेव्हा एकसंध असलेल्या) प्रवेश केला. नीलेश लंके यांनी पंचायत समितीसाठी पहिली निवडणूक लढवली होती आणि ती हरल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. लंके यांनी सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांवर अधिक लक्ष केंद्रित केले. सुपा येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदराचे स्थान निर्माण होत गेले. २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले. एक वर्षानंतर अंतर्गत कलहामुळे लंके यांनी शिवसेनेला राम राम केला; मात्र त्यांचा लोकांशी असलेला संपर्क कधीच तुटला नाही. त्यांनी ‘नीलेश लंके प्रतिष्ठान’ नावाची स्वत:ची संस्था सुरू केली आणि त्याद्वारे आपले काम सुरू ठेवले. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (तेव्हा एकसंध) प्रवेश केला आणि त्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला पाणी पाजण्यात त्यांना यश आले.

हेही वाचा : Parliament Session : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…

त्यानंतर करोना काळात खऱ्या अर्थाने नीलेश लंके यांची लोकप्रियता अहमदनगर जिल्ह्याबाहेर फोफावली. करोना महासाथीच्या काळात नीलेश लंके यांनी लोकांमध्ये जाऊन केलेल्या कामाचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. नीलेश लंके यांनी स्थानिकांच्या उपचारांसाठी गाव पातळीवर अनेक कोविड सेंटर्स उभी केली. ते स्वत: जातीने लक्ष घालून, यासंबंधित कामांची पाहणी करायचे. या कठीण काळात त्यांनी अनेकांना वैद्यकीय मदत केली; तसेच अनेकांना अन्नधान्याचा पुरवठाही केला. एकीकडे लोक एकमेकांचा संपर्क टाळत होते, तेव्हा नीलेश लंके रुग्णांच्या नातेवाइकांसमवेतच कोविड सेंटर्समध्ये झोपत होते. या सगळ्या कृतींमुळे त्यांची महाराष्ट्रात विशेष चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही फूट पडली. अजित पवार यांनी बहुतांश आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली. नीलेश लंके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या. मात्र, आपण कोणत्या गटात जाणार आहे, हे लंके यांनी लवकर स्पष्ट केलेच नाही. सरतेशेवटी अजित पवार यांच्या गटाजी बाजू घेतली असली तरीही त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल कधीही चुकीची विधाने केली नाहीत.

हेही वाचा : लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींकडे कोणते अधिकार असतील?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नीलेश लंके यांनी अजित पवार गटाला राम राम करून शरद पवार यांच्या गटाला आपलेसे केले. कारण- भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्याने सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राखीव असलेल्या या जागेवरून आपल्याला उमेदवारी मिळणे अशक्य असल्याचे त्यांना ठाऊक होते. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले आणि सुजय विखे-पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. सुजय विखे-पाटील यांनी लंके यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेवरून टोमणे मारले होते. निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर सुजय विखे-पाटील यांना सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे लंके यांनी म्हटले. लंके म्हणाले, “मला यासाठी कोणताही सराव करावा लागला नाही. मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे. काय लिहिले आहे, ते मला समजते. मी एखाद्या उच्चभ्रू व्यक्तीसारखा दिसत नाही, याचा अर्थ मला इंग्रजी बोलता येत नाही, असा होत नाही.” आता खासदार झाल्यानंतर आपल्याला शेतकरी आणि दूध उत्पादकांचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करायचे असल्याचे लंके यांनी म्हटले. “शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळायला हवा, यासाठी मी प्रयत्न करीन. माझ्या मतदारांना त्यांच्या कामांचे दाम मिळवून देण्यासाठी मी कोणतीही भाषा बोलायला तयार आहे. संसदेतही हे मुद्दे मांडायला मी मागे हटणार नाही.” आपण लंके यांच्यावर खूश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. “जननेता भाषेपुरता मर्यादित नसतो. त्यांना त्यांच्या भाषेवरून हिणवणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नव्हते. लंके यांनी त्यांना योग्य प्रकारे उत्तर दिले आहे.” राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘एक्स’वर नीलेश लंके यांना उद्देशून “जिंकलास भावा!” असे लिहिले आहे. पुढे त्यांनी इंग्रजीत म्हटले आहे, “Don’t underestimate the power of the common man… And yes, You can talk English, walk English… English is a funny language!”