आदिवासी विकास, आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री ३९ वर्षीय निमिषा सुथार यांनी २०१३ आणि २०२१ मध्ये मोरवा हडफमधून दोनदा पोटनिवडणुकीद्वारे विधानसभेवर पोहोचवण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. २०१३ आणि २०१७ मध्ये राज्य निवडणुकीत भाजपा या जागेवर पराभूत झाली होती. मात्र आता त्यांच्या रुपाने भाजपाला गुजरातमध्ये आदिवासी नेता मिळाला आहे.
पंचमहल जिल्ह्यातील एक एसटी आरक्षित जागा असलेल्या मोरवा हडफबरोबरच, सुथार यांना मंत्रीपदावर पदोन्नती देण्यातून भाजपाचा महत्त्वपूर्ण आदिवासी मतांकडे इशारा होता. जेव्हापासून त्या मंत्री बनल्या आहेत, तेव्हापासून त्या विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये अध्यक्षपद भूषवणे आणि पक्षाचा एक आदिवासी आवाज म्हणून उदयास येण्याबरोबरच सुथार यांचा लौकीक वाढत आहे.
२०१२ काँग्रेसच्या सविता खांत यांनी मोरवा हडफमधून भाजपाच्या बिजलभाई डामोर यांचा दहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यानंतर मतमोजणीच्या दिवशी सविता खंत यांच्या ब्रेन हॅमरेजमुळे झालेल्या निधनामुळे पोटनिवणूक आवश्यक होती. काँग्रेसने खांत यांचा मुलगा भूपेंद्रसिंह यांना उमेदवारी दिली,परंतु सुथार यांनी जवळपास १८ हजार मतांनी विजय मिळवला.
इलेक्ट्रॉनिक इंजिनअर आणि कॉम्प्युटर प्रोग्रमींग असिस्टंटमध्ये डिप्लोमाधारक असलेल्या सुथार यांच्यासाठी विधानसभेतील सुरुवात ही महत्त्वपूर्ण होती. ज्यांनी २०१३ मधील पोटनिवडणुकीतील शपथपत्रात स्वत:ला गृहिणी असे म्हटले होते. यानंतर २०१७ मध्येही त्यांचे नाव भाजपाच्या उमेदवारी यादीत राहिले. भाजपाने विक्रमसिंह दिंडोर यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने आपल्या सहयोगी भारतीय आदिवासी पक्षासोबत संयुक्त उमेदवार उभा केला. भूपेंद्रसिंह खांत अपक्ष म्हणून उभा राहिले, काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने नाराज झाले होते आणि दिंडोर यांच्याविरोधात विजयी झाले.
मे २०१९ मध्ये अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर भूपेंद्रसिंह यांना अपात्र ठरवण्यात आले. भूपेंद्रसिंह यांचे २०२१ मध्ये आजारपणामुळे निधन झाले. यानंतर मे २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने सुथार यांना उमेदवारी दिली आणि यावेळी त्या जवळपास ४५ हजार मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सुथार या खूप सक्रीय होत्या.