संदीप पाठक हे आम आदमी पार्टी म्हणजेच आपमधल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर संदीप पाठक यांच्याकडेच पाहिलं जातं. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यसभेवर निवडून गेले संदीप पाठक यांची गेल्या महिन्यात पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली. गेल्यावर्षी पंजाबमध्ये झालेला विजय आणि गुजरातमधे झालेली एंट्री ज्यामुळे पाक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला त्यात संदीप पाठक यांचा मोठा वाटा होता.

संदीप पाठक हे आयटी शिकवणारे माजी प्राध्यापक आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी त्यांनी आपच्या पुढील भवितव्याबाबत चर्चात केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान

गुजरातनंतर कोणत्या राज्यांकडे तुम्ही आपच्या विस्ताराच्या दृष्टीने पाहाता आहात असं विचारलं असता संदीप पाठक यांनी म्हटलं आहे की निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. आम्ही त्यामध्ये उतरण्याची तयारी सुरू केली आहे. पुढे कसे जायचं ते येणाऱ्या काळात ठरवू. महिन्याभराच्या आत आम्ही या सगळ्याची तयारी सुरू केली असेल. सरचिटणीस झाल्यापासून ज्या मॅरेथॉन बैठका घेण्यात येत आहेत त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की आम्ही नऊ राज्यांमध्ये निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे. मी आत्ता मात्र हे सांगू शकत नाही की आम्ही किती राज्यांमध्ये लढणार.

सुरतच्या नगरपालिका निवडणुकीत आप आपल्या कामगिरीवर विशेष लक्ष देऊ शकली नाही ही बाब निराशेची वाटते का? असं विचारलं असता संदीप पाठक म्हणाले की मला असं वाटत नाही. कारण कामरेजमध्ये आमच्या उमेदवाराने अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या काहींनीही एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली आहे. ही झेप मोठी आहे असं मला वाटतं. सुरतमध्ये सध्या भाजपाचं वर्चस्व आहे. मात्र मतांच्या प्रमाणाचा विचार केला तर आम्ही चांगली कामगिरी केली आहे असंही संदीप पाठक यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने आक्रमकता न दाखवणं हे तुमच्या पथ्यावर पडलं का? हा प्रश्न विचारला असता संदीप पाठक म्हणाले की आमचा पक्ष हा तरूण पक्ष आहे. काँग्रेस पक्ष लढला की नाही हा आमचा प्रश्न नाही. आम्ही निवडणूक लढवतो. लोक आता काँग्रेसकडे आशेचा किरण म्हणून पाहात नाहीत. त्यांच्याकडे स्थानिक चांगले उमेदवार आहेत. पण त्यांना हायकमांडचा पाठिंबा नसूनही ते त्यांच्या कामामुळे जिंकले. मात्र राजकारणात तिसरी शक्ती आली की काँग्रेसचा पराभव होतो हेच दिसून आलं आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांकडेही आम्ही आशेने पाहतो आहोत. कारण आता आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष झाला आहे. दिल्ली, पंजाब, गुजरात या राज्यांमधली आमची प्रगती चांगली झाली आहे. मध्यप्रदेशात आमचा महापौर आहे. तुमच्याकडे स्थानिक ताकद असल्यास तुम्ही पक्ष चांगल्या पद्धतीने बांधू शकता असंही संदीप पाठक यांनी स्पष्ट केलं.

२०१४ मध्ये आपने जवळपास प्रत्येक जागा लढवली होती ही चूक तुम्ही टाळणार का? असं विचारलं असता संदीप पाठक म्हणाले की ही चूक होती असं मला वाटत नाही. मला विचाराल तर मी म्हणेन की तो एक धाडसी प्रयत्न होता. अशी अनेक राज्यं आहेत जिथे आमचे लोक काम करत आहेत. आम्ही संख्येच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही फार जिंकलो नाही. मात्र पंजाबमध्ये आम्ही विजय मिळवला. पंजाब पर्याय म्हणून आमचा विचार करू शकतं हा विचारही आम्ही केला नव्हता असंही संदीप पाठक यांनी म्हटलं आहे.

Story img Loader