नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजप नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रीपदाची हॅट्रिक करणार आहेत. सामान्य कार्यकर्ते, विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार आणि आता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री अशी गडकरी यांची राजकीय कारकीर्द.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी राजकारणात प्रसिद्ध असलेलेल्या गडकरी यांच्या राजकीय गोतावळाही मोठा आहे. त्यांचे सर्वच पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहे. रस्ते विकास मंत्री म्हणून त्यांनी देशभर केलेल्या कामांमुळे त्यांना पुलकरी, रोडकरी म्हणूनही ओळखले जाते. २६ मे २०१४ ला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिेनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. होता २०१९ ते २०२४ या काळातही त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कार्यभार होता. महाराष्ट्रात १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

हेही वाचा….PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या खासदारांचे देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…

२००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातही त्यांनी विविध कामे केली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी अनेक उपक्रम राबवले. अपंगांना वस्तू वाटपात त्यांनी विक्रम केला. देशात कोवीडची साथ असताना नागपुरात त्यांनी प्राणवायू पुरवठ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. विविध रुग्णालयांना त्यांनी समाजाकि दाईत्व निधीतून वैद्कीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली होती. भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरी त्यांचे समाजाच्या सर्वच क्षेत्रात संबंध आहे. विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari going to achieve hat trick as union minister after third consecutive win from nagpur print politics news psg
Show comments