येत्या २३ जून रोजी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची पटणा येथे बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, अशा देशभरातील महत्त्वाच्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री आणि विरोधकांनी एकत्र करण्याची जबाबदारी घेतलेले नितीश कुमार तमिळनाडू येथील एका कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा तथा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. याच कारणामुळे पुढील दोन दिवसांत विरोधकांची बैठक होत असताना निमंत्रण देऊनही नितीश कुमार अनुपस्थित राहिल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

नितीश कुमार यांना दिले होते आमंत्रण

डीएमके पक्षाचे संस्थापक एम करुणानिधी यांच्या स्मरणार्थ एका स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमला एमके स्टॅलिन यांनी नितीश कुमार यांना आमंत्रित केले होते. मात्र प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत नितीश कुमार या कार्यक्रमाला उपस्थित राहले नाहीत. त्याऐवजी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तसेच बिहारचे जलसंपदा मंत्री संजय के झा हे नेते तमिळनाडूमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कलैग्नार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

…तर योग्य संदेश गेला असता

येत्य २३ जून रोजीच्या पटणा येथील बैठकीला साधारण २० विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी दोन दिवसांत ही बैठक पार पडणार असल्यामुळे नितीश कुमार तमिळनाडूमधील कार्यक्रमास उपस्थित राहिले असते तर योग्य संदेश गेला असता. मात्र नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांच्या ऐकीबाबत नकारात्मक संदेश गेला आहे.

संयुक्त जनता दलामध्ये अस्वस्थता?

पटणा येथील बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. असे असताना राहुल गांधी यांचा तेथे भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख केला जात आहे. हाच उद्देश समोर ठेवून त्यांचे स्वागत करण्याची तयारी केली जात आहे. दुसरीकडे नितीश कुमार नकार देत असले तरी त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा अद्याप लपून राहिलेली नाही. याच कारणामुळे राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख केला जात असल्यामुळे संयुक्त जनता दलाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

“प्रकृती ठीक नसल्यामुळे ते तमिळनाडूमध्ये गेलेले नाहीत”

यावरच काँग्रेसचे प्रवक्ते असितनाथ तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही राहुल गांधी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून बघतो. मात्र मानहानीच्या खटल्यामध्ये दोषी ठरल्यामुळे ते २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत, हे सर्वांनाच माहिती आहे. नितीश कुमार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते तमिळनाडूमध्ये गेलेले नाहीत,” असे स्पष्टीकरण असितनाथ तिवारी यांनी दिले.

“सध्या आमचे पटणा येथील बैठकीकडे लक्ष”

संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनीदेखील यावर भाष्य केले आहे. “स्वत:च्या नेत्याला भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहण्यात काहीही गैर नाही. मात्र सध्य पंतप्रधानपदाचा मुद्दा नाही. सध्या आम्ही पटणा येथील बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रकृतीच्या कारणामुळे नितीश कुमार तमिळनाडूमधील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत,” असे त्यागी म्हणाले. यावेळी त्यांनी आमच्या पक्षाकडून पटणा येथील सभा यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत, असेदेखील सांगितले.

“मी बैठकीला उपस्थित राहणार”

एम के स्टॅलिन यांनी नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेला संभ्रम मिटवण्याचा प्रयत्न केला. मी पटणा येथील बैठकीला आवर्जुन उपस्थित राहणार आहे, असे स्टॅलिन यांनी सांगितले आहे. “२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करणे गरजेचे आहे. पटणा येथे नितीश कुमार लोकशाहीला वाचवण्यासाठी पहिला दिवा लावत आहेत. मीदेखील पटणा येथे जाणार आहे. मी करुणानिधी यांच्या वारशाचा आदर करून या बैठकीला उपस्थित राहणार आहे. मी या बैठकीला उपस्थित न राहिल्यास आगामी काळात तमिळनाडूचा इतिहास पुसला जाईल,” असे म्हणत स्टॅलिन यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

“२०२४ च्या निवडणुकीत विजय महत्त्वाचा, अन्यथा…”

“देशात भाजपाचे पुन्हा सरकार आल्यास ते तमिळनाडूसाठी धोकादायक ठरेल. तमिळनाडूतील पक्षांमध्ये असलेली धर्मनिरपेक्षता देशभरात घेऊन जावी लागणार आहे. सध्या आपल्याला विजय महत्त्वाचा आहे आणि या विजयासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,” असेही स्टॅलिन म्हणाले.

तेजस्वी यादव यांनी केले स्टॅलिन यांचे कौतुक

कलैग्नार येथील कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी स्टॅलिन यांचे कौतूक केले. सामाजिक न्यायासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रयत्नांमुळे देशातील कोणत्याही घटकाला मागे राहिल्यासारखे वाटणार नाही. करुणानिधी यांनी घालून दिलेल्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला स्टॅलिन पुढे घेऊन जात आहेत, याचा मला आनंद आहे, असे तेजस्वी यादव म्हणाले.

Story img Loader