बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू-भाजपा युती सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर निर्णय होण्यापूर्वी सोमवारी राजकीय हालचाली वेगाने बदलत राहिल्यात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार गायब झाल्याची आणि अनेक जण बाजू बदलत असल्याच्याही चर्चा होत्या. बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले आहे. विधानसभेत नितीश कुमार यांच्या सरकारच्या बाजूने १२९ मते पडली आहेत. मी नितीशकुमारांना नेहमीच ‘दशरथ’ मानत आलो आहे. त्यांनी महाआघाडीशी गद्दारी का केली हे मला माहीत नाही.”बिहारमधील महाआघाडी सरकारला भाजपा घाबरला होता, नितीश कुमार पुन्हा पलटणार नाहीत याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात का?, असा सवालही माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विचारला आहे.
१८ वर्षांत जेव्हा नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते, तेव्हा ते थकलेले, गोंधळलेले आणि अस्वस्थ दिसत होते, तर तेजस्वी विजेत्यासारखे त्यांच्या विरोधात भाषण देत होते. सभागृहात गर्जना करत तेजस्वी म्हणाले होते की, “तुम्ही (नितीश) मोदीजींना हटवण्यासाठी आमच्याबरोबर आला होता. तुमचा हा पुतण्या आता एकट्याने मोदीजींच्या विरोधात उभा राहील आणि बिहारमध्ये मोदींना रोखेल, असंही त्यांनी सांगितलं. भाजप आणि नितीश सत्तेत एकत्र आल्यानंतर त्यांनी आरजेडीवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तसेच नितीश आणि भाजपाने आरजेडीवर हिंदू मुस्लिम मतांचं राजकारण केल्याचाही आरोप केला होता. खरं तर २०१३ मध्ये JD(U)च्या प्रमुखांनी जातीयवादाच्या राजकारणाचा हवाला देत भाजपाशी फारकत घेतली होती. विशेषत: भाजपाचे उगवते स्टार नरेंद्र मोदींबद्दलही नितीश यांनी नाराजी उघड केली होती. सोमवारी नितीश कुमार विधानसभेत म्हणाले की, हे लोक म्हणतील मुस्लिम त्यांच्याबरोबर आहेत. यांच्यामुळेच बऱ्याचदा हिंदू-मुस्लिम संघर्ष झाले. मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हाच त्यावर नियंत्रण ठेवले होते. विशेष म्हणजे आरजेडी हे हिंदू-मुस्लिम मतांचं राजकारण असल्यानेच नितीश यांनी त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असावा, तर तेजस्वी यादव यांनीसुद्धा नितीश यांना महाआघाडी सोडण्याचे वैध कारण देण्याचे आवाहन केलेय.
हेही वाचाः सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, पण इंडिया आघाडीचे भवितव्य काय?
खरं तर नितीश कुमार यांनी त्यांच्याकडून मुस्लिम मतं जात असल्याच्या भीतीपायीच आमच्याबरोबरची महाआघाडी तोडली आहे. त्यामुळेच आम्ही हिंदू-मुस्लिम मतांचं राजकारण करतो सांगत भाजपाच्या फुटीरतावादी राजकारणाला ते खतपाणी घालत आहेत, असंही आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुणार मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. १९९० मध्ये भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना राम मंदिरासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेदरम्यान अटक केल्यानंतर सर्वजण लालू प्रसाद यांच्या नेतृत्वात धर्मनिरपेक्षतेचे ध्वजवाहक म्हणून एकत्र आले होते. नितीश कुमार यांच्या मतांचा आधार दिवसागणिक कमी होत चालला असून, त्यामुळेच त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे, असंही सुबोध कुणार मेहता म्हणालेत.
हेही वाचाः युवक काँग्रेसच्या आंदोलनावरून नागपूरमध्ये पक्षांतर्गत बेकीचे दर्शन
जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के सी त्यागी म्हणाले की, नितीश यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. “बिहारच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेसाठी कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. बिहारमधील लालू-राबडी सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या संदर्भात त्यांचे विधान पाहिले पाहिजे आणि त्याचा परिणाम जातीय हिंसाचारात झाला होता. मुख्यमंत्री म्हणून ते उत्तम शासक आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १५ वर्षांत राज्यात भाजप किंवा आरजेडी यांच्याबरोबर सरकारचे नेतृत्व केले असले तरी त्यांच्या कार्यकाळात कोणताही मोठा जातीय हिंसाचार झालेला नाही. AIMIM चे बिहारचे एकमेव आमदार अख्तरुल इमाम म्हणाले की, “आम्ही नेहमीच जातीय शक्तींविरुद्ध लढलो आहोत. धर्मनिरपेक्षतेवरील आमचा विश्वास पुन्हा बनवून ठेवण्यासाठी आम्ही महागठबंधनाचे समर्थन केल्याचंही त्यांनी सांगितले.