पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून सत्ताधारी पक्ष भाजपा आणि विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आघाडीवर आहेत. ते मागील काही महिन्यांपासून देशातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत असून महाआघाडीसाठी प्रयत्नरत आहेत. नुकतेच त्यांनी बिजू जनता दल (बीजेडी) पक्षाचे सर्वेसर्वा तथा ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली आहे. या बैठकीनंतर नवीन पटनाईक विरोधकांना साथ देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ही राजकीय भेट नव्हती- नितीशकुमार

मंगळवारी (१० मे) नितीशकुमार यांनी नवीन पटनाईक यांची भेट घेतली. नवीन पटनाईक यांच्या ‘नवीन निवास’ या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणही घेतले. या भेटीबद्दल बोलताना नितीशकुमार यांनी आमची ही राजकीय भेट नव्हती. आगामी निवडणुकीसाठीच्या युतीसंदर्भात आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. बिहारला अतिथिगृहासाठी जागा मिळावी, यावरच आमची चर्चा झालेली आहे, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन

अतिथिगृहासाठी जमीन देण्यावर आमच्यात चर्चा- नवीन पटनाईक

नितीशकुमार आणि नवीन पटनाईक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळचे संबंध आहेत. हाच धागा पडकडून, “आमच्यात फार पूर्वीपासूनच मैत्री आहे. आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी एकमेकांचे सहकारी होतो. आमच्यात कोणत्याही राजकीय आघाडीसंदर्भात चर्चा झालेली नाही. बिहार राज्याला शासकीय अतिथिगृहासाठी पुरी येथे १.५ एकर जमीन हवी आहे. त्यावरच आमच्यात चर्चा झाली,” असे स्पष्टीकरण नवीन पटनाईक यांनी दिले.

आमच्यातील नाते खूप दृढ- नितीशकुमार

नितीशकुमार यांनीदेखील त्यांच्या आणि पटनाईक यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. “मी नवीन पटनाईक यांची सातत्याने भेट घेत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून करोना महासाथीमुळे आमची भेट होऊ शकली नाही. आमच्यातील राजकीय चर्चेबद्दल कोणीही चिंता करण्याची गरज नाही. आमच्यातील नाते खूप दृढ आहे. त्यामुळे आम्हाला त्या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही. आमच्यातील नात्याची इतरांशी तुलना करू नका,” असे नितीशकुमार यांनी सांगितले. तसेच पटणा येथे विरोधकांची एक बैठक होणार आहे. या बैठकीला नवीन पटनाईक यांना निमंत्रण देणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना योग्य वेळ आल्यावर आम्ही त्यावर विचार करू, असे नितीशकुमार म्हणाले.

बीजेडी विरोधकांसोबत जाण्याची शक्यता कमीच

विरोधकांसोबत युती करण्यात तसेच विरोधकांच्या बैठकीला जाण्यास नवीन पटनाईक हे फारसे उत्सुक नाहीत. याबाबत बीजेडीच्या नेत्याने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही ओडिशामध्ये काँग्रेसवर टीका करत लोकांकडे मते मागितलेली आहेत. तर देशपातळीवर होत असलेल्या विरोधकांच्या युतीमध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे या महाआघाडीमध्ये बीजेडी सामील होण्याची सुतराम शक्यता नाही. नितीशकुमार यांनी अगोदर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांची भेट घेऊनच विरोधकांना एकत्र करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे या आघाडीत सामील न होण्यासाठी आम्हाला तेवढे कारण पुरेसे आहे. नवीन पटनाईक यांना राष्ट्रीय राजकारणात येण्यात काहीही रस नाही. त्यांना सहाव्यांदा ओडिशा येथील विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे,” असे एका बीजेडीच्या नेत्याने सांगितले.

संवादाला सुरुवात झाली, चर्चेलाही सुरुवात होणार?

नितीशकुमार तसेच नवीन पटनाईक यांच्यातील भेटीवर जेडीयू पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नितीशकुमार यांच्या भेटीचा नेमका उद्देश नवीन पटनाईक यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. या भेटीच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांमधील चर्चेला सुरुवात झालेली आहे,” असे एका नेत्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेत्याने नितीशकुमार आणि नवीन पटनाईक यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. “नितीशकुमार आणि नवीन पटनाईक हे दोघेही सोबतच खासदार झाले होते. नवीन पटनाईक यांना त्याची जाण आहे. नवीन पटनाईक यांनी नितीशकुमार यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले,” असे जेडीयूचा दुसरा नेता म्हणाला.

नितीशकुमार यांनी घेतली प्रमुख विरोधी नेत्यांची भेट

याआधी नितीशकुमार यांना विरोधकांना एकत्र करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीपीआयएमचे सचिव सीताराम येचुरी या नेत्यांची भेट घेतली आहे. ते लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. याआधी नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. त्यानंतरच नितीशकुमार यांनी विविध राज्यांतील भाजपाविरोधी प्रमुख नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केलेली आहे.

बीजेडीकडून काँग्रेस, भाजपापासून अंतर राखण्याचा प्रयत्न

नितीशकुमार यांनी नवीन पटनाईक यांची भेट घेतली आहे. मात्र नवीन पटनाईक भाजपाला विरोध करत विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या मानसिकतेत नाही. २००० सालच्या मार्च महिन्यात बीजेडीने ओडिशामध्ये भाजपाशी युती करून सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीजेडीने ही युती तोडली होती. तेव्हापासून बीजेडी पक्ष भाजपा तसेच काँग्रेसशी समान अंतर ठेवून आहे. जो पक्ष केंद्रात सत्तेवर येईल त्या पक्षाशी चांगले संबंध ठेवणे हा उद्देश यामागे बीजेडी पक्षाचा आहे.

बीजेडीच्या खासदारांचा भाजपाला पाठिंबा

दरम्यान, बीजेडी पक्षाने भाजपाला वेगवेगळ्या मार्गांनी मदत केलेली आहे. बीजेडी पक्षाच्या लोकसभेतील १२ आणि राज्यसभेतील ८ खासदारांनी मोदी यांनाच पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बीजेडी पक्षाला विरोधकांसोबत आणण्यात नितीशकुमार यांना किती यश येणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.