बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधकांची एकजूट करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील असल्याचे दिसले आहे. प्रादेशिक पक्षातील अनेक नेत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी देशभर दौरे केले होते. २३ जून रोजी त्यांच्याच राज्यात पाटणा येथे विरोधकांची पहिली बैठक पार पडली होती. त्यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे दुसरी बैठक संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेसकडून विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) असे नाव देण्यात आले. या नावाला नितीश कुमार यांनी कडाडून विरोध केला असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने या नावाची चर्चा कोणत्याही इतर पक्षासोबत केली नव्हती. त्यामुळे अचानक हे नाव उघड केल्यानंतर नितीश कुमार यांना धक्का बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव कसे काय दिले जाऊ शकते? असा प्रश्न नितीश कुमार यांनी बैठकीतच उपस्थित केला. सूत्रांनी सांगितले की, विरोधकांना एकत्र करण्यात नितीश कुमार यांनी जे योगदान दिले, ते नाकारले जाऊ शकत नाही. पण ज्याप्रकारे काँग्रेस आघाडीवर ताबा मिळवू पाहतात ते योग्य वाटत नाही. हा निर्णय जनता दल (युनायटेड) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांना निश्चितच धक्का देणारा आहे.

हे वाचा >> ममता-राहुल यांच्या विचारमंथनातून ‘इंडिया’

जनता दल (युनायटेड) प्रतिक्रिया काय होती?

जनता दल (युनायटेड) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, नितीश कुमार यांनीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सर्वांत आधी प्रयत्न केले. त्यामुळेच विरोधकांची संख्या एवढी मोठी होऊ शकली. ते रागावू शकत नाहीत. विरोधकांची एकजूट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एनडीएची बैठक बोलावली. ललन सिंह यांनी दावा केला की, विरोधकांची एकजूट २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करील.

विरोधकांच्या एकजुटीला INDIA नाव

मंगळवारी (१८ जुलै) २६ विरोधी पक्षांचे नेते बंगळुरू येथे एकत्र जमले आणि त्यांनी विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले. भाजपाप्रणीत एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तोंड देण्यासाठी हे नाव दिले गेल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी काँग्रेसच्या आघाडीचे नाव यूपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) असे होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली २००४ व २०१४ साली यूपीएने केंद्रात सत्ता मिळवली होती.

हे ही वाचा >>

हे ही वाचा >> आता मोदी विरुद्ध INDIA ! २६ पक्षांचा एकच निर्धार; विरोधी पक्षांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

सूत्रांनी इंडिया टुडे नियमानुसार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ हे नाव पुढे केले होते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोंड देण्यासाठी आणि विरोधकांना एकसंध करण्यासाठी हे नाव दिले गेले असल्याचे सांगण्यात आले. विरोधकांच्या आघाडीचे नामकरण झाल्यानंतर राजकीय वादावादीला तोंड फुटले आहे. भाजपाने सांगितले की, नाव बदलल्याने विरोधकांचे व्यक्तिमत्त्व बदलणार नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक भारत विरुद्ध इंडिया होईल.

दुसरीकडे दिल्ली येथे भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएची बैठक दिल्ली येथे झाली. या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नकरात्मकतेच्या पायावर उभ्या असलेल्या आघाडीला यश मिळणार नाही आणि एनडीए सलग तिसरा विजय मिळवेल. विरोधकांची बैठक झाल्यानंतर काही तासांनी दिल्लीत बैठक झाली. विरोधकांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीला घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांची बैठक झाल्यानंतर एनडीएकडून ३८ पक्षांची बैठक बोलावण्यात आली.

आणखी वाचा >> “ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध ‘INDIA’ आहे”, विरोधकांच्या बैठकीनंतर राहुल गांधींकडून निर्धार व्यक्त

दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीमधील नेत्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून ‘जितेगा भारत’ अशी टॅगलाईन ठेवली आहे. तसेच बंगळुरूमधील बैठकीच्या वेळेस काही नेत्यांनी आघाडीच्या नावात भारत नाव असायला हवे, अशीही सूचना केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar opposed india as opposition alliance name shocked by congresss attitude sources kvg
Show comments