लोकसभा २००४ निवडणुकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबईत लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होती. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून मनोहर जोशी यांचा विजय निश्चिच मानला जात होता. पण काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी चमत्कार केला. गायकवाड ‘जायंट किलर’ ठरले. मतदारसंघाची सीमा बदलेल्या या मतदारसंघात गायकवाड यांची कन्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या वडिलांचा कित्ता गिरविणार का, याची उत्सुकता आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. वास्तविक गायकवाड यांची दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढण्याची इच्छा होती. कारण या मतदारसंघात त्यांचा धारावी मतदारसंघाचा समावेश होतो. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वांद्रे पूर्व व पश्चिम, विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला आणि कलिना या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मराठी, उत्तर भारतीय, मुस्लीम, दलित, गुजराती अशा संमिश्र वस्तीचा हा मतदारसंघ आहे. मराठी, महिला आणि दलित असा तिहेरी लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

हेही वाचा :गोमांस विकणाऱ्यांच्या पैशांतून भाजपाचे झेंडे… – काँग्रेसचा आरोप

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पूर्वीचा वायव्य मुंबईचा बहुतांशी भाग समाविष्ट होतो. तेव्हा वायव्य मुंबई मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. सुनील दत्त, त्यानंतर त्यांची कन्या प्रिया दत्त हे निवडून आले होते. पण २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप नेते कै. प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. वांद्रे पूर्व, चांदिवली. कुर्ला आणि कलिना हे चार मतदारसंघ काँग्रेस किंवा महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहेत. वांद्रे पश्चिम, विलेपार्ले या दोन मतदारसंघांमध्ये भाजपचा वरचष्मा आहे. यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची होऊ शकते.

हेही वाचा : राहुल गांधींपेक्षा हत्तींनी जास्त भेटी दिल्या; वायनाड मतदारसंघामधल्या मतदारांची खंत

उत्तर मध्य मुंबईत मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणिय आहे. सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार आहेत. यातूनच भाजपकडून मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये माजी मंत्री नसिम खान हे इच्छूक होते. पण त्यांना उमेदवारी मिळालेली नसल्याने त्यांची भूमिका काय राहिल यावरही गायकवाड यांचे भवितव्य अवलंबून असेल. या मतदारसंघात सुमारे पावणे तीन लाख उत्तर भारतीय तर दोन लाखांच्या आसपास गुजराती, मारवाडी मतदार आहेत. या मतांवर भाजपची भिस्त असेल. वर्षा गायकवाड यांच्यासाठी आव्हान सोपे नाही. पण २०० ४मध्ये ध्वानीमनी नसताना त्यांच्या वडिलांनी चमत्कार केला होता. या वेळी चित्र कसे असेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

Story img Loader