संजय बापट
मुंबई :
मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्द पसरलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात मराठी- गुजराती हा भाषिक तर हिंदू-मुस्लीम या धार्मिक वादातून पूर्णपणे भाषिक आणि धार्मिक वळणावर गेलेल्या या लढतीत ध्रुवीकरणाचा कोणाला फायदा होतो यावरच निकाल ठरणार आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांच्या मुलुंडमधील पुनर्वसनाच्या मुद्द्यावर भाजपला सतत स्पष्टीकरण द्यावे लागत असून, भाजपच्या बालेकिल्ल्यात हा विषय गंभीर बनल्याने ही लढत सोपी राहिलेली नाही.

ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या दोघांमध्ये लढत होत आहे. ईशान्य मुंबई हा मतदारसंघ तसा भाजपला अनुकूल असलेला मतदारसंघ. पण २०१९ मध्ये किरीट सोमय्या तर आता मनोज कोटक या विद्यमान खासदारांना बदलून पक्षाने मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. खासदारांबद्दलची नाराजी किंवा पक्ष नेतृत्वाचा अविश्वास यातून विद्यमान खासदारांना प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाते यावर शिवसेनेने प्रचारात भर दिला आहे.

amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!
Chief Minister of Uttar Pradesh and BJP leader Yogi Adityanath criticized Mahavikas Aghadi in vashim
“विरोधकांच्या महा‘अडाणी’ आघाडीला देश व धर्माची…” वाशीममध्ये कडाडले योगी आदित्यनाथ

आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : पालघर- हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा फायदा भाजप की ठाकरे गटाला?

मुंबईतील कोणत्याही निवडणुकीत भाषिक वादाची फोडणी मतांसाठी दिली जाते. पण एरव्ही ती सुप्त असते. घाटकोपरमध्ये गुजरातीबहुल इमारतींमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचारापासून रोखण्यात आले. तसा हा अगदीच साधा विषय. पण शिवसेना ठाकरे गटाने त्याला मराठी विरुद्ध गुजराती वादाचा रंग दिला. जो व्हायचा तो परिणाम झाला. कारण त्यातून मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती अशी विभागणी दिसू लागली. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाची चांगली ताकद असून, यंदा शिवसेना भाजपबरोबर नाही. त्यातच मराठी-गुजराती वादाचा सुप्त परिणाम, शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये विरोधात जाणारी अल्पसंख्याक मते यातून भाजपसाठी आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात स्पर्धेत आली आहे. यामुळेच घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करून मुलुंडमधील मतांचा खड्डा घाटकोपरमध्ये भरण्याचा प्रयत्न आहे.

धारावीकरांचे मुलुंडमधील पुनर्वसन हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरला आहे. मुलुंड पूर्व भागात धारावी आणि अन्य प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याची योजना आहे. त्या विरोधात भाजपने आवाज उठविला असला तरी अदानीसाठी लाल गालिचा अंथरणाऱ्या महायुती सरकारकडून मुलुंडमधील जागा प्रकल्पग्रस्तांना दिली जाईल, असा लोकांचा ठाम समज झाला आहे. यामुळेच मिहिर कोटेचा यांना प्रत्येक सभेत हाच मुद्दा मांडावा लागत आहे. मोदी यांच्या करिष्म्यावर कोटेचा यांची सारी मदार आहे.

आणखी वाचा-भाजपाने स्वीकारले राहुल गांधींचे आव्हान; पंतप्रधान मोदी नव्हे तर ‘हा’ युवानेता चर्चेत सहभागी होणार

शिवाजीनगर-मानखुर्द या अल्पसंख्याक बहुल मतदारसंघावर शिवसेनेचे संजय दिना पाटील यांची भिस्त आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीतून लढताना पाटील हे शिवाजीनगरमध्ये झालेल्या एक गट्ठा मतदानातून निवडून आले होते. शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये कोटेचा यांच्या प्रचार सभांवर तिनदा दगडफेक झाली. तेव्हापासूनच या भागात धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचे बघायला मिळते. कोटेचा यांनी शिवाजीनगर-मानखुर्दमधील मानखुर्द वगळून केवळ छत्रपती शिवाजीनगर असे नामकरण करण्याचे आश्वासन दिल्यापासून तेथील वातावरण अधिक धार्मिक आधारावर बदलल्याचे चित्र बघायला मिळते. झोपडपट्ट्यांमधील मराठी, उत्तर भारतीयांची मते मिळविण्याचा कोटेचा यांचा प्रयत्न आहे.

लोकांसाठी सदैव उपलब्ध असणारा, सर्व भाषिकांशी सलोख्याचे संबंध असणारा राजकारणी अशी भाजपचे मिहिर कोटेचा यांची ओळख असून विक्रोळी- भांडुपमध्ये मराठी सांस्कृतिक केंद्र, मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस उभारण्याची आणि कांजूरमार्ग व देवनारमधील घनकरचा क्षेपणभूमी बंद करण्याची ग्वाही मतदारांना देत आहेत. तसेच मोदींचा विकास यावरही महायुतीकडून प्रचारात भर दिला जात आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांचा भाऊ म्हणून परिचित असलेल्या संजय पाटील यांनी या मतदार संघातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, घनकरचा क्षेपणभूमीचा प्रश्न तसेच वाहतूक कोंडी यासोबतच धारावी झोपडपट्टीवासीय आणि प्रकल्पबाधितांचे मुलुंडमध्ये होणारे पुनर्वसन यावरुन महायुती आणि कोटेचा यांच्यावर तोफा डागायला सुरुवात केली आहे. प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या सहा हजार घरांमुळे तसेच धारावीमधील लोकांच्या पुनर्वसनामुळे मुलुंडवासियांना अनेक समस्यांना समोरे जावे लागण्याचा धोका असून याच मुद्यावरुन पाटील यांनी कोटेचा यांना लक्ष्य केले आहे. आपल्याच सरकारच्या काळात झालेल्या या दोन्ही निर्णयांमुळे मुलुंडकरांना विश्वास देतांना कोटेचा यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा – उत्तर मुंबई, पियूष गोयल यांच्यासमोर मोठे मताधिक्य टिकविण्याचे आव्हान

या मतदार संघातील मराठी आणि मुस्लिम तसेच दलित मतदारांची अधिकाधिक मते मिळविण्यासाठी संजय पाटील आणि आघाडीचे नेते- कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. तर गुजरा-मारवाडी, उत्तर भारतीयांसोबतच मनसे आणि शिंदे गटाच्या माध्यमातून मराठी मते मिळविण्याचा कोटेचा प्रयत्नशील आहेत. शिंदे गटाची या मतदार संघात फारशी ताकद नसली तरी भाजपाकडे प्रचार आणि नियोजनाची मोठी यंत्रणा आहे

संमिश्र मतदार

या मतदार संघात सुमारे २० हजार नव मतदारांसह १६लाख ३६ हजार मतदार असून त्यात सात लाख ५८ हजार महिला मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधित सात लाख ६० हजार मराठी मतदार असून त्या खालोखाल दोन लाख ४० हजार मतदार मुस्लिम तर गुजराती,मारवाडी दोन लाख मतदार आहेत. हिंदी भाषिक मतदारांची संख्याही पावणे दोन लाखाच्या आसपास आहे. विशेषतः मुलुंड, घाटकोपरमधील गुजराती-मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असून ही भाजपची हक्काची व्होटबँक समजली जात आहे. तर महाविकास आघाडीला शिवाजी नगर-मानखुर्दमधील मतदारांचा मिळणाचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार आहे.