दरवर्षी श्रावण महिन्यात कावड यात्रा निघत असते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांतील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर कावड यात्री दर्शनासाठी जात असतात. या वर्षी ५ जुलैपासून सुरू झालेली कावड यात्रा १५ जुलैपर्यंत चालणार आहे. ८ जुलै रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कावड यात्रेकरूंचे पाय धुऊन त्यांचे स्वागत केले. कावडियांचे पाय धुऊन मी त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील कावड यात्रेकरूंसाठी सर्व सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. आरोग्य शिबिरे, शौचालये, पार्किंग, तंबू आणि इतर सुविधा उभारण्यात आल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.

मागच्या वर्षीदेखील भाजपा सरकारने कावड यात्रेकरूंसाठी अशाच प्रकारची सुविधा उभारली होती. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच तरतूदही करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी कावडियांचे पाय धुतले होते.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

कावड यात्रेसाठी दरवर्षी भारताच्या विविध भागांमधून हजारो यात्रेकरू येतात. उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख, गंगोत्री, बिहारमधील सुलतानगंज आणि उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, अयोध्या व वाराणसी या तीर्थक्षेत्रांना कावड यात्री भेट देतात. भगवान महादेवाचे आशीर्वाद घेऊन कावड यात्री आपल्या कावडीत गंगा नदीचे पाणी घेऊन आपापल्या गावी जातात. विविध राज्यांतून कावड यात्रा मार्गक्रमण करीत असल्यामुळे उत्तरेतील अनेक राज्ये यासाठी नियोजन करीत असतात.

२८ जून रोजी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने राज्यातील कावड यात्रेकरूंच्या मार्गातील मांसविक्रीची दुकाने उघडण्यास बंदी घातली. सरकारचा निर्णय जाहीर करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “यात्रेकरूंच्या श्रद्धेचा आदर करण्यासाठी कावड यात्रींच्या मार्गात असलेली मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यावर स्वच्छताही करण्यात आली असून, पथदिव्यांचीही सोय करण्यात आली आहे. सध्या वातावरणात उकाडा असल्यामुळे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”

हे वाचा >> राज्ययंत्रणेच्या दुटप्पीपणाची ‘कावड’ कुणाच्या खांद्यावर?

७ जुलै रोजी नॉयडामधील मांसविक्रीची दुकाने उघडण्यास बंदी केली गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन समाजांत शांतता राखली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला मांसविक्री करणाऱ्यांनी मात्र हा त्यांच्या जगण्याच्या अधिकारावर हल्ला असल्याचे सांगितले. नॉयडाचे पोलिस उपायुक्त हरिश चंदर म्हणाले, “श्रावण महिन्यात जेव्हा कावड यात्रा निघते, तेव्हा अशा प्रकारचे आदेश दरवर्षी देण्यात येतात. कावड यात्रेकरूंचा जो मार्ग आहे, फक्त त्यावरचीच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मागच्या वर्षी गौतम बुद्धनगर प्रशासनानेदेखील कावड यात्रेकरूंच्या मार्गात असलेली मांस आणि मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.”

४ जुलै रोजी गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, त्यांनी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी हरिद्वार येथून एक हजार लिटर गंगाजल विकत घेतले आहे. “श्रावण महिना ४ जुलै रोजी सुरू झाला असून, या महिन्यात राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि शेजारच्या राज्यातून अनेक शिवभक्त गंगाजल आणण्यासाठी गाझियाबादमधून हरिद्वार येथे जातात. वाटेत गंगाजल सांडल्यास ते अपवित्र झाल्याचे मानले जाते. त्यासाठीच गाझियाबाद पोलिसांनी आपले एक पथक हरिद्वारला पाठवून, त्या ठिकाणाहून एक हजार लिटर गंगाजल आणले आहे. हे गंगाजल गाझियाबादमधील विविध पोलिस ठाण्यांत वाटले जाईल आणि तिथून ते भाविकांना देण्यात येणार येईल,” असे गाझियाबादचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (ट्रॅफिक) रामानंद कुशवाहा यांनी सांगितले.

४ जुलै रोजीच दिल्लीचे मुख्यमंत्री व आप या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारतर्फे ठिकठिकाणी कावड यात्रेकरूंसाठी शिबिर आयोजित करून सुविधा पुरविल्या. केजरीवाल म्हणाले, “दिल्ली सरकार दरवर्षी कावडीयांसाठी दिल्लीत शिबिर आयोजित करत असते. त्या ठिकाणी कावडीयांची सेवा केली जाते.” दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी सांगितले की, राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २०० शिबिरे घेण्यात आली आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कावड यात्रेकरूंच्या मार्गावर आणि मंदिराच्या ठिकाणी एक हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ३ जुलै रोजी झारखंड सरकारमध्ये नव्याने रुजू झालेल्या उत्पादन शुल्कमंत्री बेबी देवी यांनी राज्यातील देवघर येथे कावड यात्रेकरूंच्या मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.