काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गुरुवारी (७ मार्च) राजस्थानमार्गे गुजरातमध्ये दाखल झाली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अंबरिश डेर आणि ज्येष्ठ नेते तसेच माजी आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्या घडामोडींवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आणि यात्रेच्या तयारीचा भाग असलेले माजी विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस सोडत असलेल्या नेत्यांमुळे आमची झोप वगैरे काही उडालेली नाही, उलट ही आमच्यासाठी सकारात्मक बाजू असल्याचं सांगत धनानी यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे दिलखुलास मुलाखत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे माजी राज्यप्रमुख अर्जुन मोधवाडिया अन् माजी आमदार अंबरीश डेर यांच्यासह आणखी काही नेते भाजपामध्ये गेले?

खरं तर आम्ही अंबरीशभाईंना कर्जाने घेतले होते. आम्ही कर्जाची परतफेड केली याचा आम्हाला आनंद आहे. परंतु अर्जुनभाईंनी पक्षाच्या विरोधात जाऊन अशी भूमिका घेणे क्लेशदायक आहे. खरं तर ही काही पहिलीच घटना नाही किंवा ती शेवटची असण्याचेही कोणते कारण नाही. भाजपाने गेल्या २० वर्षांत आमदार आणि खासदार राहिलेल्या ८२ हून काँग्रेस नेत्यांना त्यांच्या पक्षात घेतले. आता त्यांच्याबद्दल सामान्य माणसाला विचारल्यास ८२ पैकी फक्त आठच नावे ते ओळखतील. त्यातीलही आजच्या काळातील दोन-पाच नावे असतील. भाजपा कामाच्या जोरावर मतं मिळवू शकत नसल्यानेच साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करून त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या गोटात सामील करावे लागत आहे.

खरं तर सत्ताधारी जनतेचे प्रश्न सोडवण्यास सक्षम नसल्यानेच काँग्रेसच्या नेत्यांना भीती दाखवून पक्षात सामील करून घेतले जात आहे. परंतु त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. राजकीय नेता विरुद्ध जनता अशी ही स्पर्धा असेल. स्पर्धेचा निकाल धक्कादायक असेल, यात शंका नाही.

हेही वाचाः निवडणुकांचे पडघम वाजू लागले की गॅस सिलिंडर स्वस्त! दर कमी करण्यामागचे राजकीय गणित काय?

मोढवाडिया भाजपामध्ये जाण्याच्या एक दिवस आधीपर्यंत न्याय यात्रेच्या बैठकांचा भाग होते

विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच भाजपा भरतीचे मेळावे भरवत आहे. जनता कमळा (भाजपा)च्या सरकारला निवडून देत असल्याचा आम्हाला आनंद आहे, पण सत्ताधारी नेते हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारची कामे होणे सोपे झाले असून, भाजपा कार्यकर्त्यांचे हाल होत आहेत.

हेही वाचाः Lok Sabha Election : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा शिवसेना खासदाराला राजकीय फायदा किती ?

तुमचीही भाजपाशी चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय

पेड न्यूज कॅम्पेन चालवणारे काही मीडियावाले विरोधी राजकारण्यांच्या चारित्र्याचा खून करायला निघाले आहेत, या अफवा लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यासाठी आणि काँग्रेसला नुकसान पोहोचवण्यासाठी आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते का?

काँग्रेस हा व्यक्तींचा नसून विचारांचा समूह आहे. काँग्रेसची विचारधारा आणि राज्यघटना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मला वाटते. त्यामुळे दोघांनाही पाठिंबा देणारे यात्रेला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत. महात्मा गांधी आणि सरदार (पटेल यांच्या) गुजरातने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि संविधानाचा मसुदा तयार करण्यात आघाडीची भूमिका बजावली होती. भारताचे भविष्य असलेले राहुल गांधी गांधी राज्यघटनेचे आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच सरदारांच्या गुजरातमध्ये आले आहेत.

राज्यघटनेला धोका म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता?

राज्यघटनेचा आधार घेऊन सत्तेवर आलेले आता राज्यघटनेचे उल्लंघन करीत आहेत. सर्वसामान्य माणूस खरे बोलायला घाबरतो.

तुम्ही म्हणता तो महात्मा गांधींचा आणि सरदार पटेलांचा गुजरात, पण भाजपा नेते याला मोदी आणि शाह यांचा गुजरात म्हणतात

मला आनंद आहे की, गुजरातचे लोक देशाचे नेतृत्व करीत आहेत. पण मला वाईट वाटते की, (ते) त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांपासून दूर जात आहेत आणि जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर नागरिकांमध्ये फूट पाडत आहेत.

निवडणुका इतक्या जवळ असताना राहुल गांधींची यात्रा सौराष्ट्रातच का फिरत आहे, ज्यात लोकसभेच्या ७ जागांचा समावेश आहे?

राहुल गांधी देशाला दिशा देत आहेत. जगातील सर्वात मोठ्या यात्रेचे ते नेतृत्व करीत आहेत. परंतु वेळे अभावी त्यांना फक्त दक्षिण गुजरातमध्ये जाता येतेय. येत्या काही दिवसांत गुजरात काँग्रेस राज्याच्या कानाकोपऱ्यात राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा संदेश आणि उत्साह घेऊन जाणार आहे. खरं तर राहुल गांधींच्या यात्रेचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. देशातील लोकांना एकत्र आणणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यांना जात, पंथ आणि धर्माच्या विभाजनातून बाहेर काढणे हे त्यांचं ध्येय आहे. निवडणुका हे लोकशाहीचे हृदय आहे, पण निवडणुका येतात आणि जातात. लोकांनी मतदान करण्यापूर्वी ते कोणाला मत देत आहेत, याचा नक्कीच विचार करावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

तुमचा मित्रपक्ष आम आदमी पक्षाप्रमाणेच भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवार आधीच जाहीर केलेत. काँग्रेसने का नाही केले?

तपासणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याबरोबरच पक्ष संघटनेने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. फक्त आता शेवटचा हात फिरवलं बाकी आहे, असा माझा विश्वास आहे. काही पक्षांना निवडणूक लढवण्याची घाई झालेली दिसते. खरं तर काँग्रेस कुणाच्या नावे नव्हे तर आपले काम दाखवून जनतेकडून मते मागते. आज सत्तेत असलेले लोक त्यांच्या कामाच्या जोरावर मते मागू शकत नाहीत.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपासून काँग्रेस दूर राहिल्यामुळेच पक्ष सोडल्याचे मोधवाडिया सांगतात?

भाजपाचे हिंदुत्व हे संकुचित आहे. भाजपाचे हिंदुत्व हे जय श्री राम आणि अयोध्येतील मंदिर या घोषणेपुरते मर्यादित आहे. त्यामुळे ते पोकळ आहे. खरं तर भगवान प्रभू राम हे जीवन कसे जगावे, याचे उत्तम प्रतीक आहेत आणि तेच या देशातील प्रत्येक व्यक्तीचे संस्कार आहेत. प्रभू रामांनी शिकवलेल्या मर्यादेचा भंग करून भाजपाने त्यांच्या नावावर राजकारण केले. त्या काळी काँग्रेसनेच अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचे कुलूप उघडून लोकांना दर्शन दिले, त्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. ही संधी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनीच उपलब्ध करून दिली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलाय, त्याचा आदर करण्याचे धोरण काँग्रेस सरकारांनी स्वीकारले आहे आणि आम्ही ते कायम ठेवले आहे.काँग्रेस या देशातील सर्व धर्मांचा आदर करते. शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) करणे चुकीचे असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. त्यामुळे या देशाच्या संस्कृतीचा आदर करत काँग्रेसने अंतर ठेवले.

२०२२ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून तुम्ही गायब होतात?

२०२२ मध्ये लोकांनी भाजपाच्या बाजूने दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो, त्यांना १५६ जागा जिंकण्यात मदत मिळाली, जी स्वातंत्र्यानंतरची सर्वोच्च निवडणूक ठरली. गुजरातच्या जनतेने तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या सर्व २६ जागांवर भाजपाचे सदस्य निवडून दिले आहेत. गेल्या एक वर्षापासून आपण लोकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात व्यस्त होतो. सर्व निवडून आलेल्या संस्था भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून चालवल्या जातात, तेव्हा ते लोकांचे प्रश्न सोडवतील, अशी आमची अपेक्षा असते. पण दुर्दैवाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसून आले आहे.

सरकारला धारेवर धरण्याचे कर्तव्य विरोधकांना का करता आले नाही?

लोकशाही वाचवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे हे मला मान्य आहे. पण गुजरातच्या जनतेने दुर्दैवाने विरोधकांसाठी जागा सोडलेली नाही. गुजरातच्या जनतेने विरोधकांना मौन बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजपाचे सर्वोच्च राष्ट्रीय नेते गुजरातचे असताना राज्यात काँग्रेस समान उंचीचा नेता का तयार करू शकली नाही?

१९९० मध्ये मी काँग्रेस कार्यकर्ता झालो तेव्हापासून मी गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार पाहिले नाही. काँग्रेस १९९५ पासून विरोधी पक्षात आहे आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तर गुजरातच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षाच्या कर्तव्यातूनही मुक्त केल्याचेच मला वाटते. त्यामुळेच भाजपा हा आकांक्षांचा केंद्रबिंदू बनला आहे. मला वाटतं २०२४ च्या निवडणुकीत तरी गुजरातची जनता ही मंडई, महागाई, बेरोजगारी, अत्याचार, भ्रष्टाचार, टॅक्स टेररिझमचे प्रश्न भाजपासमोर ठेवून मतदान करेल.

भाजपाने येत्या निवडणुकीत लोकसभेच्या ३७० जागा आणि गुजरातमधील सर्व २६ जागा तिसऱ्यांदा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले, काँग्रेसने काही लक्ष्य आहे का?

देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काँग्रेसचे लक्ष्य आहे. आम्ही २००४च्या पुनरावृत्तीकडे वाटचाल करीत आहोत, असे मी ठामपणे सांगतो. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांचे फील गुड फॅक्टर दावे आणि इंडिया शायनिंग मोहिमेचा धमाकेदार चेहरा भाजपाकडे होता. सोनिया गांधी परदेशी असल्याची चर्चा होती… इतकं होऊनही लोकांनी परिवर्तनाला कौल दिला आणि UPA वन सरकारला मतदान केलं. UPA वन आणि UPA टूमध्ये गुजरातच्या जनतेने काँग्रेसचे अनुक्रमे १२ आणि ११ खासदार निवडून दिले. त्यावेळीही भाजपाने अपप्रचार केला होता. जनतेला आता भाजपाची राजवट आणि त्यांचे नेते नीट समजले आहेत. मला वाटते की, गुजरात आणि संपूर्ण देश २०२४ मध्ये २००४ ची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे.