१२ जून रोजी एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथ सोहळ्यावेळी मंचावर तेलुगू जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या दोन कुटुंबातील सदस्य हजर होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव किंवा एनटीआर यांचे हे विस्तारित कुटुंब पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आले आहे. दुसऱ्या बाजूला अभिनेता पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीलाही दमदार यश मिळाले आहे. ते सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे बंधू आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असल्याने त्यांचेही कुटुंब आता राजकीय चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आले आहे. अशाप्रकारे या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात दोन फिल्मी तसेच राजकीय पार्श्वभूमीची कुटुंबे शक्तिप्रदर्शन करताना दिसले. तसेच आंध्र प्रदेशमध्ये चित्रपट आणि राजकारण यांच्यातील खोलवर असलेले सहसंबंधही पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तेलुगू चित्रपट सृष्टीवर कम्मा आणि काप्पू या दोन जातींमधील अभिनेत्यांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यानंतर उद्योग आणि राजकारणावरही त्यांचा तितकाच प्रभाव दिसून येतो.

हेही वाचा : भाजपाला पसमांदा मुस्लिमांची मतं का मिळाली नाहीत?

nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
maharashtra assembly election 2024 karnataka telangana and himachal pradesh bjp leaders criticized congress
काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ फसवणूक; कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजपा नेत्यांची टीका
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?

एनटीआर आणि त्यांची मुले

एनटीआर हे १९५० पासून १९७० च्या दशकापर्यंत प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये विशेषकरून त्यांनी अनेक पौराणिक पात्रांच्या भूमिका साकारल्या. मायाबाजार (१९५७) या चित्रपटात त्यांनी कृष्णाची; तर दाना वीरा सूर कर्ण (१९७७) या चित्रपटात त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. हे दोन्ही चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपट मानले जातात. पौराणिक पात्रे साकारल्यामुळे तेलुगू माणसाच्या हृदयामध्ये एक वेगळे स्थान त्यांना निर्माण करण्यात यश मिळाले. त्यामुळेच त्यांना राजकारणामध्येही प्रभाव टाकण्यात आपल्या चित्रपट कारकिर्दीची मदत झाली. त्यांनी १९८२ साली तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) नावाचा पक्ष स्थापन केला. तत्कालीन सत्ताधारी पक्ष काँग्रेसला शह देण्यासाठी या पक्षाची निर्मिती करण्यात आली. एनटीआर यांचा हा प्रादेशिक पक्ष चांगल्या प्रकारे यशस्वी ठरला आणि एनटीआर तब्बल तीनवेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. बेंगळुरूमधील अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये शिकवणारे प्राध्यापक एस. व्ही. श्रीनिवास यांनी त्यांच्या ‘पॉलिटिक्स ॲज परफॉर्मन्स : अ सोशल हिस्ट्री ऑफ द तेलुगू सिनेमा’ या पुस्तकात लिहिले आहे की, “एनटीआर यांचा निवडणुकीचा प्रचार त्यांच्या चित्रपटातील कामगिरीसारखाच होता. प्रचारासाठी केलेल्या भाषणांमधून त्यांनी नाटक आणि चित्रपटांमध्ये साकारलेल्या पात्रांचीच आठवण व्हायची.”

एनटीआर यांना त्यांच्या पहिल्या पत्नी बसवतारकम यांच्यापासून १२ मुले झाली. त्यांची बहुतांश मुले चित्रपटसृष्टीतच आहेत. काही जण निर्माते, तर काही जण अभिनेते आहेत. त्यांचा चौथा मुलगा नंदामुरी हरिकृष्ण यांनी अभिनेता म्हणून चांगले यश मिळवले होते. त्यांनी दहा-बारा चित्रपटांमध्ये काम केले होते. ते २००८ ते २०१३ या काळात टीडीपी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार होते. २९ ऑगस्ट २०१९ रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांचा मोटार अपघातात मृत्यू झाला. एनटीआर यांचे पाचवे सुपुत्र बालाकृष्णा (६४) हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते देखील हिंदुपूर विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिले आहेत. एनटीआर यांच्या मुलींपैकी नारा भुवनेश्वरी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याशी विवाह केला. त्यांची दुसरी कन्या डी. पुरंदेश्वरी या सध्या आंध्र प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार डी. वेंकटेश्वरा राव यांच्याशी विवाह केला आहे. एनटीआर यांनी १९९३ मध्ये त्यांच्या चरित्रकार लक्ष्मी पार्वती यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंबामधील चलबिचल वाढली. एनटीआर आपला सगळा राजकीय वारसा त्यांच्याहून ३५ वर्षांनी लहान असलेल्या पार्वती यांना सोपवतील की काय, अशी भीती कुटुंबीयांना वाटू लागली. याच भीतीतून ऑगस्ट-सप्टेंबर १९९५ मध्ये नायडू यांनी काही आमदारांच्या गटासह बंडखोरी केली. नायडू यांनी आपल्याच सासऱ्याची जागा घेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायडूंनी आपल्याबरोबर विश्वासघात केला असून लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करणारी एक ध्वनीफितही एनटीआर यांनी रेकॉर्ड केली होती, असे म्हटले जाते. त्यांनी ही ध्वनीफित प्रसिद्ध करण्याआधीच ८ जानेवारी, १९९६ रोजी एनटीआर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नायडू आणि पुरंदेश्वरी यांच्यात वितुष्ट आले. कुटुंबामध्येही यावरूनच फूट पडली.

सध्या कोण कुणाच्या बरोबर?

एनटीआर यांच्या पुढच्या पिढीतील सदस्य राजकारणात आहेत. एनटीआर यांचे सुपुत्र हरिकृष्ण यांचा मुलगा म्हणजेच ज्युनियर एनटीआर होय. त्यांच्या आजोबांच्या नावावरूनच त्याचे नाव ठेवण्यात आले होते. त्यालाही राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे म्हटले जाते. त्याने ‘आरआरआर’ या सुप्रसिद्ध चित्रपटातही भूमिका केली आहे. बालाकृष्णा यांच्या कन्या एन. ब्राह्मणी यांनी चंद्राबाबू नायडू यांचे सुपुत्र नारा लोकेश यांच्याबरोबर विवाह केला आहे. नारा लोकेश यांनी मंगलगिरी मतदारसंघातून विजय प्राप्त केला असून त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. लोकेश यांनी स्टॅनफोर्डमधून एमबीएची पदवी घेतली असून त्यांच्याकडे राजकीय अनुभवाची कमतरता असल्याचे एकेकाळी म्हटले जात होते. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारा लोकेश यांनी काढलेली ‘युवा गलम’ (युवकांचा आवाज) ही यात्रा लोकप्रिय ठरली आणि आता सत्तेत आल्यानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणातील त्यांचे स्थान मजबूत झाले आहे. त्यांच्या पत्नी ब्राह्मणी यांनीदेखील स्टॅनफोर्डमधूनच एमबीएची पदवी घेतलेली असून सध्या त्या हेरिटेज फूड्स या कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. चंद्राबाबू नायडू यांनीच १९९२ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती.

चिरंजीवी आणि त्यांचे कुटुंब

कोनिडेला शिवशंकर वरप्रसाद म्हणजेच चिरंजीवी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘मेगास्टार’ मानले जातात. त्यांनी विविध धाटणीच्या १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या काही चाहत्यांच्या तसेच समीक्षकांच्या मते, चिरंजीवी हे एनटीआर यांच्यानंतरचे एका पिढीचे स्टार आहेत. चिरंजीवी यांना दोन भाऊ आहेत. त्यातील एक बंधू नागा बाबू हे चित्रपट निर्माते तसेच अभिनेते आहेत, तर दुसरे बंधू म्हणजेच जन सेना पार्टीचे संस्थापक पवन कल्याण हे ‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेमकी खदखद कसली?

चिरंजीवी यांनी के. सुरेखा यांच्याशी विवाह केला आहे. त्या अल्लू रामलिंगय्या यांच्या कन्या आहेत. अल्लू रामलिंगय्या हेदेखील आधीच्या पिढीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांनी एनटीआर यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अल्लू रामलिंगय्या यांचा मुलगा अल्लू अरविंद गीता आर्ट्स नावाचे एक मोठे तेलुगू प्रॉडक्शन हाऊस चालवतो. त्यांचाच मुलगा म्हणजेच सुप्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुन होय. ‘पुष्पा : द राइज’ (२०२१) या सुपरहिट चित्रपटांसह इतरही अनेक चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. चिरंजीवी आणि सुरेखा यांचा मुलगा म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेता रामचरण होय. रामचरणने ज्युनियर एनटीआरबरोबर ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये काम केले आहे. रामचरणने उपासना कामिनेनी कोनिडेला यांच्याबरोबर विवाह केला आहे. उपासना यांचे आजोबा सी प्रताप रेड्डी हे अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. उपासनाचे काका के. विश्वेश्वर रेड्डी हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर तेलंगणातील चेवेल्ला येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अपोलो समूहाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक के. संगिता रेड्डी यांच्याशी विवाह केला आहे. ते ४,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार होते.

आपल्या लहान भावाप्रमाणेच चिरंजीवी यांनीही राजकारणात रस घेतला होता. त्यांनी २६ ऑगस्ट २००८ साली प्रजा राजयम पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यांचा राजकारणातील प्रवेश हा त्यांच्या कोणत्याही चित्रपटाप्रमाणेच नाट्यमय होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या पक्षाने १८ जागा जिंकल्या. मात्र, काँग्रेसला आव्हान देण्यात हा पक्ष अपयशी ठरला. त्यावेळी वाय. एस. राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेते होते. त्यांचेच सुपुत्र म्हणजेच वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत वायएसआर काँग्रेस पार्टी नावाचा नवा पक्ष २०१२ साली स्थापन केला. फारशी चांगली कामगिरी न करू शकल्यामुळे चिरंजीवी यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी बोलून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि काँग्रेसशी संधान बांधले. त्यांना राज्यसभेमध्ये सदस्यत्व देण्यात आले तसेच ते पर्यटन राज्यमंत्रीही होते. त्यानंतर त्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही. त्यांचा लहान भाऊ पवन कल्याण यांनाही जन सेना पार्टीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात जम बसवताना अनेक अडचणी आल्या. शेवटी त्या पार करत २१ जागा मिळवण्यात या पक्षाला यश आले आहे. राज्याच्या राजकारणात एक नवा पक्ष उदयाला आला आहे.