१२ जून रोजी एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथ सोहळ्यावेळी मंचावर तेलुगू जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या दोन कुटुंबातील सदस्य हजर होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव किंवा एनटीआर यांचे हे विस्तारित कुटुंब पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आले आहे. दुसऱ्या बाजूला अभिनेता पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीलाही दमदार यश मिळाले आहे. ते सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे बंधू आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असल्याने त्यांचेही कुटुंब आता राजकीय चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आले आहे. अशाप्रकारे या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात दोन फिल्मी तसेच राजकीय पार्श्वभूमीची कुटुंबे शक्तिप्रदर्शन करताना दिसले. तसेच आंध्र प्रदेशमध्ये चित्रपट आणि राजकारण यांच्यातील खोलवर असलेले सहसंबंधही पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तेलुगू चित्रपट सृष्टीवर कम्मा आणि काप्पू या दोन जातींमधील अभिनेत्यांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यानंतर उद्योग आणि राजकारणावरही त्यांचा तितकाच प्रभाव दिसून येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा