बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)बरोबर पुन्हा एकदा युती केली आहे. गेल्या काही दशकांत चौथ्यांदा त्यांनी बाजू बदलली आहे.

सध्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत, नितीश यांच्या नेतृत्वाखालील जेडी(यू)कडे ४५ आमदार आहेत आणि भाजपाकडे ७८ आमदार आहेत. या आकडेवारीने युतीची संख्या १२३ वर नेली आहे. या युतीला आणखी एक अपक्ष आपला पाठिंबा दर्शविणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांसह आरजेडीकडे एकत्रित ११४ आमदार आहेत; ज्यात बहुमतासाठी आठ आमदार कमी आहेत.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जेडी(यू)चे वर्चस्व असलेल्या राज्यात इंडिया आघाडीसाठी निवडणूकदृष्ट्या हे मोठे नुकसान आहे. जेडी(यू) आणि भाजपाची पूर्वीही युती झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर चांगले प्रदर्शन करू शकतात हे सर्वश्रुत आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेडी(यू) आणि भाजपा युतीने चांगली कामगिरी केली होती. यंदाही निवडणुकांमध्ये ही युती फायद्याची ठरेल.

लोकसभा निवडणूक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जेडी(यू) आणि लोक जनशक्ती पार्टी (एलपीजी) यांचा समावेश होता. राज्यातील ४० संसदीय जागांपैकी भाजप व जेडीयूने प्रत्येकी १७ जागा आणि एलजेपीने सहा जागा लढवल्या. ५४.३४% च्या एकत्रित मतांसह, युतीने राज्यात ४० पैकी ३९ जागा जिंकल्या. भाजपा आणि एलजेपीने लढविलेल्या सर्व जागा जिंकल्या. त्यातील जेडी(यू)ची एक जागा काँग्रेसकडे गेली.

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)च्या नेतृत्वाखालील आघाडीसाठी हा संघर्ष होता; ज्यात काँग्रेस आणि इतर तीन लहान पक्षांचा समावेश होत. त्यांनी ३१.२३% मते मिळवूनही एकत्रितपणे फक्त १ जागा जिंकली. नऊ जागा लढविलेल्या काँग्रेसने ती एक जागा जिंकली; तर आरजेडीने लढविलेल्या १९ जागांपैकी त्यांना एकही जागा जिंकता आली. १५.६८% मते मिळवूनही आरजेडीची शून्य संख्या होती. यात भाजपाला २४.०६% आणि जेडी(यू) २२.२६% मते मिळाली.

२०१४ मध्ये पहिल्या मोदी लाटेत जेडी(यू)ने ३८ जागा स्वतंत्रपणे लढविल्या होत्या; परंतु १६.०४% मतांसह फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपा, एलजेपी आणि अन्य एका प्रादेशिक पक्षाचा समावेश असलेल्या एनडीएने ३१ जागा जिंकल्या होत्या आणि जेडी(यू) च्या दुप्पट मतांसह तो आकडा ३९.४१% होता. आरजेडी-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३०.२४% मते मिळूनही केवळ सात जागा मिळाल्या होत्या.

२००९ च्या लोकसभा निवडणुकाही भाजपा-जेडी(यू) युतीचे प्रभावीपणे काम करण्याचे आणखी एक उदाहरण होते. त्यांनी मिळून ३२ जागा जिंकल्या होत्या आणि ३७.९७% मते मिळवली होती. जेडी(यू) ने त्यावेळी लढलेल्या २५ पैकी २० जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाला त्यावेळी कमी भागीदार होती. तेव्हा भाजपाने १५ जागांपैकी १२ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत केंद्रात सत्तेवर आलेल्या काँग्रेसने बिहारमध्ये निराशाजनक कामगिरी नोंदवली होती, त्यांनी लढविलेल्या ३७ जागांपैकी १०.२६% मते मिळवून फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन आरजेडी-एलपीजे युतीने २५.८१% मतांसह चार जागा जिंकल्या होत्या.

१९८४ पासून बिहारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा फार मोठा सहभाग राहिलेला नाही. राज्यात एक महत्त्वाचा पक्ष म्हणून भाजपाचा उदय १९९० च्या दशकात झाला जेव्हा जनता दल राज्यात आघाडीवर होता. १९९९ मध्ये आरजेडी आणि नंतर २००३ मध्ये जेडी(यू)मध्ये फूट पडल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मोठ्या विजयापर्यंत या प्रादेशिक पक्षांनी राज्याच्या संसदीय जागांवर आपली छाप पाडण्यास सुरुवात केली.

विधानसभा निवडणूक

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजपा, जेडी(यू), एलजेपी आणि राज्यातील दोन लहान पक्षांचा समावेश होता. १२५ आमदार आणि ३७.२६% मतांसह युतीने २४३ सदस्यांच्या सभागृहात १२२ जागांच्या बहुमताचा आकडा पार केला. निकालाचा सर्वांत उल्लेखनीय पैलू म्हणजे भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आणि त्याने लढविलेल्या ११० जागांपैकी १९.४७% मतांसह ७४ जागांवर विजय मिळवला. जेडी(यू) तिसऱ्या क्रमांकावर होता आणि त्याने ११५ पैकी ४३ जागांवर १५.३९% मतांसह विजय मिळवला. परंतु, यावेळी भाजपाने नितीश यांना सहाव्या टर्मसाठी मुख्यमंत्री म्हणून पुढे केले.

आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या महागठबंधन युतीने २०२० च्या निवडणुकीत एनडीएला काट्याची टक्कर दिली. त्यांनी ३७.२३% मते मिळवून ११० जागा जिंकल्या (एनडीएच्या संख्येपेक्षा फक्त ०.०३% कमी). आरजेडीने यात विशेष कामगिरी नोंदवली आणि आरजेडी यावेळी सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आरजेडीने लढविलेल्या १४४ पैकी ७५ जागा जिंकून २३.११% मते मिळवली. इतर पक्षांनी ४.६४% मतांसह १६ जागा जिंकल्या; तर काँग्रेस या आघाडीत पिछाडीवर होती. कारण- त्यांनी ९.४८% मतांसह लढवfलेल्या ७० पैकी फक्त १९ जागांवर विजय मिळवला. दोन वर्षांनंतर नितीश यांनी आरजेडी आणि काँग्रेससह महागठबंधन सरकारमध्ये सामील होण्यासाठी एनडीए सोडले.

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडी(यू)ने काँग्रेससह दीर्घकालीन प्रतिस्पर्धी असलेल्या आरजेडीसोबत युती केली होती. एनडीए सोडल्यानंतर आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक एकट्याने लढविल्यानंतर त्यांचे प्रदर्शन निराशाजनक होते. २०१४ च्या मोदी लाटेत लोकसभेत भाजपाच्या विजयानंतरही विरोधकांनी ४१.८४% मतांसह १७८ जागा जिंकल्या. आरजेडी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जागांच्या बाबतीत १८.३५% मतांसह ८० जागांवर विजय मिळवीत पुन्हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. जेडी(यू) १६.८३% मतांसह ७१ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर होता. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढविल्या होत्या. काँग्रेसनेही या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. ६.६६% मतांसह त्यांनी लढविलेल्या ४१ पैकी २७ जागा जिंकल्या.

एनडीएने एकत्रित ३४.०८% मते मिळवून ५८ जागा जिंकल्या. प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेल्या आघाडीत ज्येष्ठ पक्ष असलेल्या भाजपाने १५७ जागांपैकी ५३ जागा एकट्याने जिंकल्या होत्या. २४.४२% मते मिळविलेल्या आरजेडीपेक्षा ६% पेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या भाजपाची कामगिरी या निवडणुकांमध्ये लक्षणीय होती.

हेही वाचा : कधी युती तर कधी टोकाची टीका, जाणून घ्या नितीश कुमार यांचे १० वर्षांतील राजकारण!

२००० पासून म्हणजे बिहारमधून झारखंड वेगळे केले गेले तेव्हापासून, आरजेडी आणि जेडी(यू) हे प्रबळ पक्ष राहिले. बिहारमध्ये भाजपा उदयास येईपर्यंत या दोन पक्षांचेच वर्चस्व होते. तर दुसरीकडे, गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली.

Story img Loader