मुंबई : मतदान यंत्रात घोळ झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या आमदारांनी शपथ घेतली. दोन दिवसांत एकूण २८० सदस्यांचा शपथविधी पार पडला. आठ जणांचा शपथविधी अद्याप बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी शपथ घेतली होती. दुसऱ्या दिवशी १०७ जणांचा शपथविधी झाला. मंगलप्रभात लोढा व सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये तर अनुप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेत शपथ घेतली. साजिद खान पठाण यांनी हिंदीतून शपथ घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य आमदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली.

हेही वाचा >>>शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट

श्याम खोेडे यांनी डॉ. हेडगेवार यांना स्मरून तर शंकर जगताप यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना स्मरून शपथ घेतली. बाबासाहेब देशमुख यांनी आजोबा गणपतराव देशमुख यांना स्मरून शपथ घेतली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी वडिलांना स्मरून शपथ घेतली.

आठ जणांचा शपथविधी बाकी

जयंत पाटील, उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, शेखर निकम, सुनील शेळके या आठ आमदारांनी अद्याप शपथ घेतलेली नाही.