आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार राजकारण होत आहे. ओबीसी समाजाची मते खेचण्यासाठी भाजपा आणि समाजवादी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लखनऊ येथे २ जुलै रोजी दोन ‘अपना दल’ पक्षांनी आयोजित केलेल्या सोनेलाल पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपा आणि समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सोनेलाल पटेल यांनी बसपामधून बाहेर पडून १९९५ साली अपना दल पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर पक्षाचे दोन तुकडे पडले आहेत. अपना दल (सोनेलाल) ज्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल करतात. तर दुसरा अपना दल (कमेरावादी) या पक्षाचे नेतृत्व सोनेलाल पटेल यांच्या पत्नी क्रिष्णा आणि दुसरी मुलगी पल्लवी पटेल करतात. या दोन्ही दलांनी २ जुलै रोजी सोनेलाल पटेल यांच्या जयंतीनिमित्त लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये सभागृहाची नोंदणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा