सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांची मतपेढी तयार व्हावी अशी रचना करत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर भारत राष्ट्र समितीचा डोळा असेल असा निश्चय के. चंद्रशेखर राव यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेतून व्यक्त केला.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुरेशी ताकद लावत नाहीत, हा पूर्वइतिहास जाणून घेऊन त्या राजकीय पोकळीत ‘ बीआरएस’चा प्रवेश होऊ शकतो, अशी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच दोन किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा राजकीय पटलावर अपयशी ठरलेले नेत्यांना ‘केसीआर’ यांचा आधार वाटू लागला आहे. नाराज आणि अपयशी व्यक्तींना सोबत घेऊन ग्रामीण मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याच्या प्रयत्नांना किती यश मिळेल याविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांचा गट बीड, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात तसा कमकुवत आहे.

हेही वाचा >>> Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेनेच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम

ज्या जिल्ह्यांमध्ये ताकद आहे अशा छत्रपती संभाजीनगर, जालना व धाराशीव मतदारसंघातील काही गट आणि गण यातील ताकद वगळता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शिवसेनेचे मोठे नेते ताकद लावत नाहीत. मनसे हा तसा शहरी पक्ष आहे. एखादा राज ठाकरे यांचा समर्थक चुकून निवडून आलाच तर त्याचे पुष्पगुच्छ अथवा हार घालून कौतुक करण्यापलिकडे मनसे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालत नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मतांची गोळाबेरीज करण्याची क्षमता असणारा वंचित बहुजन पक्षही बाजार समित्या, पंचायती समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये फारसा रस दाखवत नाही. कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहकारी संस्थांवरील ताबा कायम ठेवायचा असतो म्हणून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना बळ देणे त्यांना भाग पडते. कॉग्रेस- राष्ट्रवादीची ताकद असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये २०१४ पासून प्रमूख लढत भाजप बरोबर होताना दिसते. त्यामुळेच ग्रामीण मतदारांना ‘ बीआरएस’ हा पर्याय असू शकतो असे ओळखून ‘केसीआर’ रणनीती आखत असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा >>> माजी आमदार आशीष देशमुख यांचे तळ्यात-मळ्यात

काही ठराविक संख्येत आमदार निवडून आणून वाटाघाटाची ताकद वाढविणे, अशी राज्यातील छोट्या पक्षांच्या राजकारणाची आतापर्यंतची रित होती. त्याला छेद देत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवू, असे के. चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच सिंचन, शेती या राज्याच्या अखत्यारित असणाऱ्या विषयांवर ‘केसीआर’ यांच्या भाषणाची मांडणी बेतलेली आहे. सिंचनांच्या योजनांमधील अपयश, पाणी पुरवठ्याची अजागळ व्यवस्था यावर भाष्य करत तेलंगणा राष्ट्र समितीने ग्रामीण मतदार हाच प्राधान्यक्रम असेल असे सभेतून स्पष्ट केले आहे.

राज्यातील आणि विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी संघटनेस नेताच नव्हता. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते सैरभैर होते. शेतकरी संघटनेचा बिल्ला खिशाला मिरविणाऱ्या या अभ्यासू कार्यकर्त्यास पर्याय नसल्याने ते नेतृत्व शोधत होते. शरद जोशी यांचे भाषणात नाव घेत या सर्व कार्यकर्त्यांना जवळ करण्याचे धोरण केसीआर यांनी अवलंबले आहे. त्याला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. विविध पक्षातील नाराज आणि राजकीय दृष्या पुन्हा नशीब आजमावून पाहणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात अधिक आहे. ती सारी मंडळी आता ‘गुलाबी झेंडा’ हाती घेताना दिसू लागली आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी

शहरांमध्ये सभा घेताना दक्षिण प्रचाराचा बाज आता मराठवाड्यात दिसू लागल्याने ‘ केसीआर’ यांच्या आगमनाचे औत्सुक्य दिसू लागताच काही माजी नगरसेवकांनी व माजी आमदारांनी ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश केला आहे. एखाद्या राज्यात प्रवेश करताना राखावयाचा डामडौल झगमगाटी असायला हवा याची काळजी घेताना शहरी वस्त्यांमधून गर्दी जमविण्यासाठी खासे प्रयत्न केल्याचेही सभेच्या गर्दीवरुन दिसून येत होते. शहरी भागात मोठ्या जाहीर सभांमधून ग्रामीण मतदारांना साद घालण्याचा के. चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये यशस्वी होऊ शकतो, असा आशावाद निर्माण करण्यात ‘बीआरएस’ला यश मिळत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी स्थानिक पातळीवर ‘कार्यकर्ते’ काम करतील का, काही प्रश्न तडीस नेण्यासाठी आवाज तरी उठवतील का, यावर सारे अवलंबून असेल, असे सांगण्यात येत आहे.