काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा परदेशातून भाजपावर हल्लाबोल केला. “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला कसेही करून पुन्हा सत्तेत यायचे आहे आणि त्यांच्या कृतीमध्ये हिंदूंसाठी काहीही नाही.”, अशी टीका राहुल गांधी यांनी शनिवारी (दि. ९ सप्टेंबर) पॅरिसमधील सायन्सेस पीओ विद्यापीठ येथे संवाद साधत असताना केली. सायन्सेस पीओ विद्यापीठ हे फ्रान्समधील समाजशास्त्र विषयातील प्रितिष्ठित संस्था असल्याचे मानले जाते.

यावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा, लोकशाही यंत्रणा वाचविण्यासाठी विरोधक लढत असलेली लढाई आणि जागतिक विषयांवर आपली मते मांडली. राहुल गांधी यांनी सांगितले की, विरोधी पक्ष भारताचा आत्मा जपण्यासाठी लढा देण्यास कटिबद्ध आहे आणि देश सध्याच्या अशांत वातवरणातून नक्कीच बाहेर येईल. ब्रुसेल्स नंतर राहुल गांधी यांनी भेट दिलेले पॅरिस हे दुसरे शहर आहे.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?

राहुल गांधी यांना हिंदू राष्ट्रवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, “मी गीता वाचली आहे. मी अनेक उपनिषदे वाचली आहेत. मी अनेक हिंदू ग्रंथ वाचले आहेत. त्यावरून सांगू शकतो की, भाजपा सध्या जे काही करत आहे, त्यात हिंदूंसाठी काहीही नाही”. याबाबतचा व्हिडिओ आता राहुल गांधी यांच्या टविटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचा >> जी-२० परिषद ते ‘भारत-इंडिया’ वाद; युरोप दौऱ्यावर असताना राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले …

“दहशत माजवा किंवा तुमच्यापेक्षा कमकुवत असलेल्या लोकांचे नुकसान करा”, हे मी कुठेही, कोणत्याही हिंदू ग्रंथात वाचले नाही किंवा कुणा विद्वान हिंदू व्यक्तीकडून ऐकलेले नाही. हिंदू राष्ट्रवाद ही संकल्पना आणि हा शब्द चुकीचा आहे. हिंदू राष्ट्रवाद असे काही नसते. त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे आणि त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार आहेत. त्यांना फक्त काही लोकांचे वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यांच्यात हिंदू असे काही नाही.”, असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

भारतातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधकांचा आवाज दाबला जातोय आणि घटनात्मक संस्था काबीज केल्या जात आहेत, असे दावे राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्याच्या निमित्ताने अनेकदा केले आहेत. यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात राहुल गांधी यूकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी भारतातील लोकशाही ही जगाच्या हिताची कशी आहे आणि भारतातील लोकशाही कमकुवत झाल्यास त्याचा जगावर कसा परिणाम होईल, याबद्दल भाष्य केले होते. या विधानानंतर भाजपाकडून राहुल गांधीवर बरीच टीका झाली. परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असल्याचा आरोप भाजपाने केला आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही केली.

इंडिया आणि भारत या वादावर बोलत असताना गांधी म्हणाले की, संविधानात स्पष्टपणे “इंडिया दॅट इज द भारत, राज्यांचा संघ” असा उल्लेख केलेला आहे. या राज्यांनी एकत्र येऊन इंडिया किंवा भारत बनला आहे. सर्वात महत्त्वाचे काय आहे, तर या राज्यातील सर्व लोकांचा आवाज ऐकला जावा आणि कुणाच्याही आवाजाला दाबता कामा नये, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.