संतोष मासोळे

धुळे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ दिल्याचा परिणाम जिल्ह्यातील पाचपैकी शिंदखेडा आणि धुळे शहर या दोन विधानसभा मतदार संघात निश्चितपणे होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात फारसे काही स्थान नसलेल्या राष्ट्रवादीचा झालाच तर, भाजपला फायदाच होऊ शकेल.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Sakoli, Nana Patole, Somdutt Karanjkar, teli vote,
साकोलीत पटोले, करंजेकर व ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत, तेली, कुणबींच्या मतांवर विजय अवलंबून
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?

राष्ट्रवादीचे जिल्ह्यात अलीकडे फारसे अस्तित्व दिसत नाही. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर तर पक्षाची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. शहर जिहाध्यक्ष रणजित भोसले यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवून पक्षात प्राण भरण्याचे प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे आणि नंदुरबार जिल्हा प्रभारी माजी आमदार अनिल गोटे यांनीही आपल्या परीने पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु, वय आणि प्रकृति अधूनमधून साथ देत नसल्याने गोटे हे पूर्ण क्षमतेने पक्षकार्यात सक्रिय होऊ शकलेले नाहीत. अशातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने जिल्ह्यातील उरल्यासुरल्या राष्ट्रवादीच्या भविष्यातील आशेवर पाणी फेरले आहे.

हेही वाचा… बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे विखे-पाटील यांचीच अधिक कोंडी

याआधी माजी आमदार गोटे आणि शहर जिल्हाध्यक्ष भोसले यांच्यातील गटबाजीतून धुळेकरांची करमणूक झाली होती. भोसले आणि गोटे दोन्हीही शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु, दोघांमध्ये पक्ष कार्यासाठी कधीही एकमत झालेले दिसले नाही. माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, किरण शिंदे हेही पक्षात फारसे सक्रिय नाहीत. माजी आमदार गोटे यांच्यासह भोसले, बेडसे यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. किरण पाटील आणि किरण शिंदे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षकार्य करण्यास पसंती दिली आहे. हे दोन्ही जण आधीपासूनच अजित पवार समर्थक असून अलीकडे दोंडाईचा (शिंदखेडा) येथे पक्षप्रवेश झालेले ज्ञानेश्वर भामरे यांची त्यांना साथ लाभली आहे. असे असले तरी ज्ञानेश्वर भामरे यांनी पक्षाचे दोंडाईचा शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार यांना पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या पत्रिकेत कुठेही स्थान दिले नसल्याने भामरे यांच्याबद्दल शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे भामरे यांच्या प्रवेशावर आक्षेप घेण्यात आला होता. यामुळे भामरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीतच एक गट तयार झाला. भामरे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या आशेने राष्ट्रवादीत प्रवेश केला असताना आता नवीन घडामोडींमुळे त्यांची चिंता वाढली आहे. भाजपचे विद्यमान आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांची शिंदखेड्याची हक्काची जागा असल्याने राष्ट्रवादीला या ठिकाणचा आग्रह धरता येणार नाही. यामुळे भामरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा… कोल्हापूरात सहकारात राजकीय फेरमांडणी होणार

दुसरीकडे धुळे शहर विधानसभा मतदार संघातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मागील निवडणुकीवेळी भाजप-सेना जागा वाटपात शहरातील जागा शिवसेनेला सुटली होती. आता महापालिकेवर भाजपचीच सत्ता असल्याने या जागेवर भाजप दावा करू शकेल. भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, खासदार डॉ. सुभाष भामरे हे या ठिकाणी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. याचवेळी राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार अनिल गोटे, विद्यमान जिल्हाध्यक्ष रणजित भोसले हेही इच्छुक आहेत.

हेही वाचा… सांगलीत जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम राहणार ?

शिवसेनेचा ठाकरे विरुद्ध शिंदे गट जसा एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची कुठलीही संधी सोडत नाही. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या गटात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला तर नवल वाटू नये.

गेल्या वीस वर्षापासून मी शरद पवार यांच्या विचाराने राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. धर्मनिरपेक्ष, पुरोगामी चळवळीच्या लोकांना घेऊन यापुढे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले आहे. तेच माझे नेते असून यापुढे त्यांच्या आदेशाने व विचारानेच सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणार आहे. – रणजीतराजे भोसले ( जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी, धुळे शहर)