उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबईत येत आहेत. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदार यांना मूर्मू यांच्यासह होणाऱ्या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना किंवा शिवसेनेला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. 

द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार आणि अन्य नेते त्यांच्या समवेत असतील. भाजप, शिंदे गट व अपक्ष आमदार-खासदारांबरोबर मुर्मू यांची बैठक विमानतळाजवळील पंचतारांकित लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन मुर्मू या बैठकीत करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप व शिंदे गटातील व इतर छोट्या पक्षांचे नेते, आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

द्रौपदी मुर्मू कोण आहेत? पाहा व्हिडीओ –

शिवसेना खासदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना किंवा शिवसेनेच्या आमदार-खासदारांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. शिंदे गटाला आमंत्रित करण्यात आले असून एनडीएच्या बैठकीत प्रवक्ते दीपक केसरकर हे सहभागी झाले आहेत. ठाकरे गटाला आमंत्रित करण्यात येणार नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. तर बुधवारी सकाळपर्यंत तरी आमंत्रण आले नसल्याचे व त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच नसल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ‘लोकसत्ता ‘ला सांगितले.