दयानंद लिपारे

राजकीय समीकरणात आतापर्यंत भाजपचे सहयोगी सदस्य असलेले माजी मंत्री, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे लवकरच भाजप प्रवेश करत हाती कमळ घेणार आहेत. आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आवाडे, राहुल आवाडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.राज्यसभा आणि विधानपरिषद या पाठोपाठच्या निवडणुकीत भाजपची सरशी झाली. पहिल्या निवडणुकीत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यानंतर भाजपने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. बदलता राजकीय प्रवाह लक्षात घेऊन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला केवळ पाठिंबा न देता भाजपच्या झेंड्याखाली निवडणुका लढण्याची नवी भूमिका घेतली आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

गेल्या काही दिवसातील कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी वारंवार ‘भाजप, भाजप आणि भाजप’ असा उच्चार करण्यास सुरुवात केली आहे. यापुढील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये केलेल्या कामाने प्रभावित होऊन भाजपवासी झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आवाडे कुटुंबीय भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक व महाडिक परिवार, आमदार विनय कोरे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर तसेच आवाडे परिवार एकत्रित राहिल्याने जिल्ह्यात पिछाडीवर राहिलेल्या भाजपला नवी ऊर्जा मिळू शकते.

चार वर्षांपूर्वी आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करीत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. निकालानंतर त्यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला. तेव्हा त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी संपर्क साधला होता ; पण त्यांनी नकार देत भाजपचीच साथ कायम ठेवली होती. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले असताना त्यांनी भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सूचक म्हणून भरला. विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना उमेदवार संपर्क साधत होते; तथापि आपण भाजपवासी झालो आहे, असेच आवाडे सांगत राहिले. त्यांचा भाजप प्रवेश ही केवळ औपचारिकता उरली असून ती कधी पूर्ण होणार आणि भाजपमध्ये त्यांना नेमके काय स्थान मिळणार याची चर्चा होत आहे. तर आता राज्यात भाजप – एकनाथ शिंदे गटाची सत्ता आकाराला येत असल्याने आमदार आवाडे यांना मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची नामी संधीही मिळताना दिसत आहे.

काँग्रेस, अपक्ष ते भाजप

प्रकाश आवाडे यांनी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून ते दोन वेळा मंत्रीही होते. सर्वाधिक ऊस गाळप करणारा जवाहर साखर कारखाना, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आवाडे इचलकरंजी बहुराज्य शेड्युल्ड सहकारी बँक, प्रोसेसर्स, टेक्साईल पार्क, मेगा पॉवररलुम प्रकल्प आदी विविध सहकारी संस्था, डीकेटीई शिक्षण संस्था यावर प्रकाश आवाडे यांचे नेतृत्व आहे. त्यांचे वडील माजी खासदार, माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे अशा तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत.

Story img Loader