नागपूर : नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने मोठं पाऊल उचलत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र विधिमंडळ सचिवांकडे दिलेल्या पत्रावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने मविआ मधील मतभेद उघड झाले आहे.
हेही वाचा… विधानसभा अध्यक्षाच्याविरोधात आतापर्यंत ११ अविश्वास ठराव दाखल
हेही वाचा… त्रिपूरात भाजपचा उलटा प्रवास
काँग्रेसचे आमदार सुनील केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचं हे पत्र दिलं. या पत्रावर अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने अविश्वास ठरावा इतकीच पवार यांनी न केलेल्या स्वाक्षरीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे विधानसभा अध्यक्ष विरोधी बाकावरील सदस्यांना बोलू देत नाही असा आरोप होत असला तरी पवार याना मात्र अध्यक्षांकडून असा अनुभव नाही. जयंत पाटील यांचे निलंबन झाले तेव्हा पवार अध्यक्षांच्या निर्णयावर संताप नोंदवतील, अशी अपेक्षा होती, पण पवार यांनी मवाळ भूमिका घेतली होती. या वेळी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष नाराज झाले होते. आता अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या निमित्ताने मविआ मधील मतभेद उघड झाले आहे.