मुंबई : मतदानयंत्राद्वारे मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी १५व्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदस्यांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. परंतु महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे समाजवादी पक्ष व माकपच्या आमदारांनी शपथ घेतली. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले, तेच आता शपथ घ्यायला नकार देत असतील तर हा जनतेचाही अपमान आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नवीन विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात सदस्यांच्या शपथविधीने झाली. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, तालिका सदस्यांचा शपथविधी सुरू असतानाच सभागृहात उपस्थित असलेले विरोधी सदस्य बाहेर पडले. मतदानयंत्रांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार घातला. बहुमताचे सरकार आल्यानंतरही राज्यात उत्साहाचे वातावरण नाही. हे बहुमत जनतेने दिलेले नाही. निवडणूक आयोग आणि ईव्हीएमने दिल्याचा आरोप शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

Commissioner Shekhar Singh orders closure of RO project in Pimpri pune news
अखेर पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्प बंद; आयुक्तांचा आदेश
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
alandi illegal warkari educational institutes
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांच्या तपासणीसाठी २० समित्यांची स्थापना; आज, उद्या तपासणी
election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप

हेही वाचा >>>नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क

मारकडवाडी येथील रहिवाशांनीही मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जमावबंदीला सामोरे जावे लागले, त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शपथ घेतली नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महात्मा गांधी यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी मारकडवाडी तेथील ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन पुकारले. त्यांचा नक्की काय गुन्हा होता, की त्यांना अटक करण्यात आली. सरकार घाबरल्याने कारवाई झाली. आता मारकडवाडीचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. सरकारच्या या एकाधिकारशाही विरोधात स्वातंत्र्यांचा हा दुसरा अध्याय सुरू झाल्याचे राष्ट्रवादीचे गट नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Mahayuti Government : महायुतीत कोणत्या सहा खात्यांसाठी नाराजीनाट्य रंगण्याची चिन्ह; खातेवाटप जाहीर होण्यास उशीर का लागतोय?

शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार सभागृहात जाऊन बसले, तर आघाडीत असलेल्या सपा तसेच माकपच्या आमदारांनी शपथ घेतली. याबाबत बोलताना सपाचे आमदार रईस शेख यांनी आम्हाला कोणताच निरोप आला नाही, काही सांगण्यातही आले नसल्याचे स्पष्ट केले.

समन्वयाचा अभाव

महाविकास आघाडीत कोणताही समन्वय नव्हता. काँग्रेसकडून शपथविधीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेला हा निर्णय माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य सदस्यांपर्यंत पोहोचलाच नाही. ते सभागृहात जाण्याच्या तयारीने विधिमंडळात आले, नंतर निरोप आल्याने ते पक्ष कार्यालयात पोहोचले.

Story img Loader