विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीची मुंबईत गुरुवारी (३१ऑगस्ट) आणि शुक्रवारी (१ सप्टेंबर) तिसरी बैठक होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील एकूण २६ पक्ष उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पहिल्या दिवशी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले असून या दोन दिवसीय बैठकीत वेगवेगळ्या महत्त्त्वाच्या मुद्द्यांव चर्चा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीच्या मानचिन्हाचे (लोगो) अनावरण केले जाणार आहे.

गुरुवार, शुक्रवार दोन दिवस बैठक

विरोधकांच्या या दोन दिवसीय बैठकीत मानचिन्हाच्या अनावरणासह संयोजकपदी योग्य नेत्याची नेमणूक, आघाडीची औपचारिक रचना, भविष्यातील रणनीती अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संयोजकपदाच्या निवडीवरून या आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद दिसून आले आहेत. अनेक प्रमुख पक्ष या पदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे संयोजकपदावरही कोणाची निवड होणार? या मुद्द्यावर काय तोडगा काढला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray on Rudraksh in hand
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हातात शिवबंधन नाही तर रुद्राक्ष, काय आहे कारण? म्हणाले, “मी..”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bags Of Rahul Gandhi Checked At Amravati.
Rahul Gandhi: कुणालाच सुट्टी नाही! निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या राहुल गांधींच्याही बॅगा; पाहा व्हिडिओ
aaditya thackeray on rss bjp maharashtra election
Aaditya Thackeray: “मला RSS ला प्रश्न विचारायचा आहे की..”, आदित्य ठाकरेंचा सवाल; भाजपाच्या सत्तेतील वाट्याचं मांडलं गणित!
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : महायुतीला बिगर मराठा मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात…”
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला सवाल, “उलेमांच्या मागण्या…”
Aditya Thackeray vidhan sabha
वरळीतील ठाकरे गटाच्या प्रचाराची भिस्त तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी उपमहापौरांवर

गुरुवारी अनौपचारिक चर्चा, उद्धव ठाकरेंकडून स्नेहभोजन

आघाडीची ही बैठक गुरुवारपासून सुरु होणार असली तरी शुक्रवारी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. गुरुवारी आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांत अनौपचारिक चर्चा होणार आहेत. तसेच गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वांना स्नेहभोजनाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे. या दोन दिवसीय बैठकीत समन्वय समिती तसेच आघाडीच्या प्रचारासाठी कार्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसीय बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने भविष्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत काँग्रेस पक्ष आपच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करू शकतो. यासह विरोधकांची आघाडी झालेली असली तरी जागावाटप हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. हा मुद्दा चर्चेला आल्यास आघाडीतील घटकपक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. याबाबबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू केलेली नाही. लवकरच या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या विषयावर बैठकीत चर्चा झाल्यास त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवण्यात येईल,” असे शरद पवार यांनी सांगितले.

मुंबईतील बैठकीला २८ पक्ष उपस्थित

मुंबईतील दोन दिवसीय बैठकीला २८ पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याआधी बंगळुरू येथे पार पडलेल्या बैठकीला एकूण २६ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. म्हणजेच मुंबईतील बैठकीत आणखी दोन पक्षांचा समावेश झालेला आहे. मात्र हे दोन पक्ष कोणते आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आघाडीचे संयोजकपद कोणाकडे?

आघाडीचे संयोजकपद कोणाकडे जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. आमची बैठक होऊ द्या. याबैठकीत विस्तृत चर्चा होईल. त्यानंतर संयोजकपद कोणत्या पक्षाकडे जाणार, हे ठरवले जाईल, असे ठाकरेंनी सांगितले. तसेच सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीच्या संयोजकपदी कोण आहे. हे कोणाला माहिती आहे का? असा सवालही त्यांनी केला.

आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?

विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार आहेत. मात्र मुद्दा हा भाजपाचा आहे. भाजपाकडे पंतप्रधानपदाची निवड करायला स्वातंत्र्य आहे का? आपण विद्यमान पंतप्रधानांची कार्यपद्धती पाहिली आहे. आपण त्यांच्या कामाबाबत समाधानी आहोत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

एआयएमआयएम, बसपा पक्षाचा आघाडीत समावेश होणार?

अकाली दल, एआयएमआयएम यासारखे पक्ष अद्याप विरोधकांच्या आघाडीत सामील झालेले नाहीत. याबाबत विचारले असता, आमची यातील काही पक्षांशी चर्चा सुरू आहे. या पक्षांच्या आघाडी समावेशावर आघाडीतील पक्षांशी चर्चा करूनच निर्णय घेता येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षदेखील या आघाडीचा भाग नाही. यावर बोलताना मायावती यांची भाजपाशी चर्चा सुरू असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर आपली भूमिका स्पष्ट करावी. एकदा त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा विरोधकांच्या आघाडीत समावेश करावा की नाही? यावर चर्चा करता येईल, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.