आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनीच जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधकांनी काही महिने आधीपासूनच सत्ताधारी भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला होता. २३ जून रोजी विरोधकांनी पाटणा येथे पहिली बैठक घेतली. त्यानंतर आज (१७ जुलै) बंगळुरू येथे दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच सत्ताधारी भाजपनेही आता मित्रपक्षांची जमवाजमव सुरू केली आहे. मंगळवारी (१८ जुलै) दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष आपापल्या आघाडीमधील दोन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षांच्या हालचालींकडे इतर पक्षांचेही लक्ष लागले आहे.

बंगळुरू येथे २६ विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेस, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एमएल), शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बंगळुरू येथे जमणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती आणि किमान समान कार्यक्रमावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मात्र आज पहिल्या दिवशी बंगळुरू येथे उपस्थित राहू शकले नाहीत. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आजही शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते मुंबईतच होते. मंगळवारी कदाचित ते बंगळुरूमधील बैठकीला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येते.

Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे

भाजप नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दिल्ली येथे मंगळवारी (१८ जुलै) बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिली आहे. यासोबतच काही जुने सहकारी जसे की, लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते चिराग पासवान उपस्थित राहणार असल्याचे कळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या बैठकीला हजेरी लावणार असून विरोधकांच्या संख्याबळाला सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निमित्ताने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षांना किती जागा मिळाल्या होत्या, हे पाहू.

विरोधकांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास लोकसभेत काँग्रेसने ५२ जागा मिळवल्या आहेत. त्यांच्या मागे द्रमुक २३, तृणमूल काँग्रेस २२, जनता दल (यू) १६, समाजवादी पार्टी ५, सीपीआयएम ३, नॅशनल कॉन्फरन्स ३, आययुएमएल ३, सीपीआय २ आणि इतर काही पक्षांचे मिळून एकूण १२४ खासदार आहेत. या सर्व पक्षांना मिळून २०१९ च्या निवडणुकीत ३४.४७ टक्के मतदान मिळाले होते.

२२ पक्षांखेरीज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यातील दोन गट सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकीत सामील झालेले आहेत. त्यांच्या खासदारांचीही दोन गटात विभागणी झाली आहे. २०१९ साली शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. सध्या त्यांचे १२ हून अधिक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहेत; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार लोकसभेत निवडून आले होते. त्यापैकी सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत, तर उर्वरीत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल हे अद्याप शरद पवार गटासोबत आहेत.

दुसऱ्या बाजूला ओडिशाचा बिजू जनता दल, आंध्र प्रदेशचा वायएसआर काँग्रेस यांनी अद्याप आपली भूमिका उघड केलेली नाही; तर जनता दल (धर्मनिरपेक्ष), बहुजन समाज पक्ष, शिरोमणी अकाली दल आणि तेलगू देसम पार्टी यांनीही अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. यातील काही पक्ष एनडीएचा घटक पक्ष राहिलेले आहेत, तर काही पक्ष कधीकाळी युपीए म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीचा भाग होते. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात यांनी आपली भूमिका उघड केलेली नाही. विशेष म्हणजे, या सहा पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या निमित्ताने भाजपला पाठिंबा दिला होता. या सहा पक्षांकडे मिळून ५० हून अधिक खासदार आहेत.

सध्या भाजपकडे स्वतःचे ३०३ खासदार असून लोक जनशक्ती पक्षाच्या दोन्ही गटाचे मिळून सहा खासदार आहेत. अपना दल (एस) गटाचे २, अण्णाद्रमुक १ आणि इतर पाच पक्षांच्या पाच खासदारांचे पाठबळ आहे. भाजपचे स्वतःचे आणि मित्रपक्षांचे मिळून ३१७ खासदार आहेत; तर मागच्या निवडणुकीत त्यांना ४०.८१ टक्के मतदान मिळाले होते.