आज (२३ जून) पटणा येथे विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला १६ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. ही बैठक तब्बल ४ तास चालली. विशेष म्हणजे या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, आगामी रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची पुढच्या महिन्यात शिमला येथे बैठक होणार आहे. या बैठकीत प्रत्येक राज्यासाठी काय रणनीती असावी, यावर चर्चा केली जाणार आहे.

बैठकीत आम आदमी पार्टी-काँग्रेस पक्षात खडाजंगी

या बैठकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला मोदी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात (दिल्लीमधील नोकरशाहीचा अधिकार केंद्राकडे) भूमिका घ्यावी अशी मागणी केली. तर अरविंद केजरीवाल यांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. आम आदमी पार्टी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात एक करार झाला आहे. याच कारणामुळे काँग्रेस पक्ष मोदी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विरोध करत नाही, असा दावा केल्याचे खरगे केजरीवाल यांना उद्देशून म्हणाले.

Devendra Fadnavis
Maharashtra News: वर्षा बंगला पाडणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Ajit pawar on union budget 2025
Budget 2025: अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? अर्थमंत्री अजित पवार म्हणाले…
solar projects ajit pawar
सौर ऊर्जा प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”
State Sports Minister Datta Bharane reaction on sharad pawar and ajit pawar coming togather
“शरद पवार, अजित पवार एकत्र आले तर…”, दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा

शिमला येथील बैठकीत काय होणार?

विरोधकांची आगामी बैठक शिमाला येथे होणार आहे. या बैठकीत जागावाटप तसेच एका पक्षाला किती जागा मिळणार हे ठरवले जाईल, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. तसेच येत्या १० ते १२ जुलै दरम्यान शिमला येथील बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सर्व राज्यांतील जागांसदर्भात चर्चा केली जाईल. २०२४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढायला हवी. आम्ही भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचे ठरवले आहे, अशी माहिती खरगे यांनी दिली.

…म्हणून आम्ही लवचिकतेचे धोरण स्वीकारले- राहुल गांधी

राहुल गांधी यांनीदेखील देशातील स्वायत्त संस्थांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. “ही विचारांची लढाई आहे. आमच्यात नक्कीच काही मतभेद आहेत. मात्र विचारधारा जपण्यासाठी आम्ही काही ठिकाणी लवचिकतेचे धोरण स्वीकारले आहे. एकत्र येण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे. ती चालत राहणार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीदेखील बैठकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. आम्ही पटणा येथून सुरू केलेली मोहीम ही जनआंदोलनाची सुरुवात आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Story img Loader