ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले… अशा घोषणा देत सोमवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

हेही वाचानर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? भुजबळांच्या मिश्किल प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची भंबेरी

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय, अशा घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा- आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यास मिळणाऱ्या प्रतिसादाने बंडखोर अस्वस्थ

अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारला धारेवर धरण्यास सुरू केल्याचे  आंदोलनातून दाखवून दिले आहे.

Story img Loader