माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला होता. इ पलानीस्वामी यांची पक्षाच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती; तर सहसमन्वयकाचे काम पाहणारे ओ पनीरसेल्वम यांची पक्षविरोधी कारवायांबद्द्ल हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाचे प्रमुखपद मिळावे यासाठी ओ पनीरसेल्वम यांनी न्यायालयाचे दार ठोठावले; परंतु पक्षाच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आणि त्यांची मागणी फेटाळली. परंतु, आता आगामी लोकसभा निवडणुकीत ‘खरे ओपीएस’ कोण हे सिद्ध करण्यासाठी त्यांना लढा द्यावा लागणार आहे. कारण- रामनाथपुरम मतदारसंघात एकाच नावाचे पाच उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

पाच ओपीएस निवडणुकीच्या रिंगणात

तमिळनाडूमध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तमिळनाडूतील रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघात एआयएडीएमकेचे नेतृत्व गमावलेल्या माजी मुख्यमंत्र्यांसह इतर चार ओ पनीरसेल्वम शर्यतीत आहेत. माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम रामनाथपुरममधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती केली आहे. इतर चार ओपीएसदेखील सर्व अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. त्यापैकी एक उसिलमपटचे, दुसरे कत्तूरचे व इतर दोन मदुराईचे रहिवासी आहेत.

Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

या चार उमेदवारांपैकी एका उमेदवाराच्या वडिलांच्या नावातही साम्य आहे. “यातील एका उमेदवाराच्या वडिलांचे नाव ओत्चाथेवर आहे; तर माजी मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव ओट्टाकरथेवर आहे. पन्नीरसेल्वम हे नाव तमीळमध्ये सामान्य आहे; परंतु ‘ओ’ने सुरू होणारे नाव क्वचितच पाहायला मिळते. इतर उमेदवारांच्या वडिलांची नावे ओचप्पन, ओय्याराम व ओय्याठेवर अशी आहेत,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, आणखी दोन ओपीएस उमेदवारी अर्ज भरू शकतात.

माजी मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढणार

तमिळनाडूतील रामनाथपुरम मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. एकाच मतदारसंघात पाच ओ पन्नीरसेल्वम लढणार असल्याने लोकसभेच्या शर्यतीत पहिल्यांदाच उतरलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढवले आहे. कारण- नावामुळे मतांची विभागणी होणे निश्चित आहे; ज्याचा फटका माजी मुख्यमंत्र्यांना बसेल. एकाच मतदारसंघातून एकाच नावांच्या इतर चार उमेदवारांना उतरवणे ही पलानीस्वामी यांची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.

अण्णाद्रमुक आणि द्रमुक पक्षाची जुनी रणनीती

अण्णाद्रमुक आणि द्रमुक पक्षाची ही जुनी रणनीती राहिली आहे. यापूर्वीही निवडणुकांमध्ये त्यांनी अनेकदा मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी उमेदवार उतरवल्याचे सांगितले जाते. परंतु, यात दुसर्‍यांचा हात असल्याचे सांगत, हे सर्व दावे त्यांनी फेटाळून लावले आहेत. रामनाथपुरम मतदारसंघात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. ओ पन्नीरसेल्वमदेखील ओबीसी आहेत. द्रमुक आणि अण्णाद्रमुक दोन्ही पक्षांना अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळत आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि अण्णाद्रमुकची युती आहे; तर द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने रामनाथपुरममध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल)चे नवाज कानी यांना उमेदवारी दिली आहे.

ओ पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी का करण्यात आली?

डिसेंबर २०१६ मध्ये अण्णाद्रमुक पक्षाच्या जे जयललिता यांचे निधन झाल्यानंतर पक्ष कमकुवत होऊ लागला. एकेकाळी ओ पन्नीरसेल्वम जयललिता यांच्या जवळचे मानले जायचे. एका प्रकरणी जयललिता यांच्याविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू होती. तेव्हा पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी ओ पन्नीरसेल्वम यांनाच दिली. जयललिता यांच्या निधनानंतर ओपीएस यांनी पूर्णवेळ मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. २०१७ च्या सुरुवातीला जयललिता यांच्या जवळच्या सहायक व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात त्यांनी केलेल्या करवाईने पक्षात दोन गट पडले. पक्ष विभाजित झाला आणि विश्वासदर्शक ठरावात त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा : Loksabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आव्हान देणार्‍या सोनल पटेल कोण आहेत?

२०१७ मध्ये शशिकला आणि त्यांचे पुतणे टी. टी. व्ही. दिनकरन यांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी ओपीएस आणि पलानीस्वामी एकत्र आले. परंतु, यामुळे ओपीएस यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री ओपीएस एनडीएचा भाग आहेत. तसेच दिनकरनदेखील याच एनडीएचा एक भाग आहेत; जे थेंनीमधून निवडणूक लढविणार आहेत.

Story img Loader