बिपीन देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
औरंगाबाद : शिवसेना पुन्हा दुभंगली तेव्हा मराठवाड्यातून जे बोटांवर मोजण्याएवढे मोजकेच आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले त्यातील एक नाव म्हणजे कैलास घोडके पाटील. स्मानाबाद तालुक्यातील सारोळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार कैलास पाटील पीकविमा प्रश्नावरून आठवडाभर केलेल्या उपोषणातून चर्चेत राहिले. सारोळा तालुक्यातील सारोळ्याचे गावचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख, असा त्यांचा राजकीय प्रवासाचा चढता आलेख राहिलेला आहे.
या राजकीय प्रवासात शेती आणि पाणी, यांना केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी स्वतःतील नेतृत्व विकसित करताना संघटन पातळीवर पकड निर्माण केली. मांजरा व तेरणा नदीवर असलेल्या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या जागी लातूर प्रारूपातील बॅरेजेस लावण्यासाठी असो की कृष्णा मराठवाडा योजनेंतर्गत असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम बदलून घेण्यासाठी असो, त्यानुषंगाने केलेल्या पाठपुराव्याला ते त्यांच्या कामांच्या यादीत प्राधान्याने अग्रभागी ठेवतात. आमदार कैलास पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत उस्मानाबादजवळील सारोळा गावात ९ किमीपर्यंत केलेले खोलीकरण व रुंदीकरण काम दखलपात्र ठरले. उस्मानाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले आमदार कैलास पाटील यांचे प्राथमिक शिक्षण देवधानोरा जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे. उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातून स्वतंत्रच विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी पटलावर आणली. तसेच उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर करण्याची मागणी लावून धरली. यासाठी ४९८ पदांनाही मंजुरी मिळवून घेतली.
हेही वाचा: तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध
आमदार कैलास पाटील यांची २०१८ साली शिवसेना जिल्हाप्रमुखपदावर वर्णी लागली आणि पाठोपाठ जिल्ह्यातील राजकीय घडामोडीत झालेल्या बदलानंतर विधानसभेसाठी उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जेमतेम चाळिशीच्या आतील तरुण सर्वमान्य चेहरा म्हणून कैलास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. २०१९ च्या विधानसभेवर ते निवडूनही गेले. स्वतः प्रयोगशील शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून पुरस्कार पटकावणारे आमदार कैलास पाटील यांनी तरुण शेतकऱ्यांचे संघटनही मजबूत करून घेतलेले होते.
हेही वाचा: वंदना भगत : महिलांच्या प्रश्नांसाठी संघर्ष
शिवाय २०१३ मध्ये २५० तरुण शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक कंपनीही स्थापन केली. त्याचा थेट फायदा ३ हजार शेतकऱ्यांना मिळवून दिला. यांत्रिकीकरणातून काढणी ते पेरणीचे ३०० एकरवर प्रयोग करून घेतले. उस्मानाबादच्या राजकारणात आपला ठसा अमीट ठेवायचा असेल तर सहकार क्षेत्रातही स्वतंत्र अस्तित्वाची चुणूक दाखवणे गरजेचे, याची जाणीव ठेवून आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा सहकार मंडळावर पदधिकारी म्हणून काम केले. तर कै. भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, उस्मानाबादचे अध्यक्षपद सांभाळून सहकार क्षेत्रातही छाप पाडली आहे.