पालघर : शिवसेना शिंदे गटाचा मतदारसंघ असताना भाजपमधून लढण्याचे वक्तव्य केल्याने शिवसेनेत उमटलेला नाराजीचा सूर आणि भाजपने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची अवस्था ‘घर का न घाट का’ अशी झाली. यातूनच खासदारकीची हॅटट्रिक साधण्याचे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. पालघरसह राज्यातील काही जागांवर महायुती मधील कोणत्या पक्षाकडून उमेदवारी द्यायची याबाबत गेले काही आठवडे चर्चा सुरू होती. अखेर जागा वाटपाचा तिढा सुटल्या नंतर पालघरची जागा ही भाजपा कडे जाऊन डॉ. हेमंत सवरा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. सन २००४, २००९, २०२१४ व २०१६ (पोट निवडणूक) या चार विधानसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या राजेंद्र गावित यांना सन २००९ वगळता अन्य निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. २०१३ मध्ये त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते व पालघर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा