BJP Victory in Gola Gokarannath By-Election: उत्तर प्रदेशमधील गोला गोकरनात पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला. मागील अनेक निवडणुकांपासून भाजपा पन्ना प्रमुखांना महत्त्वाची भूमिका सोपवत आहे. परंतु गोला गोकरनाथच्या पोटनिवडणुकीत पक्षाने पहिल्यांदाच पन्ना समितीचा वापर केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला. गोळा गोकर्णनाथमध्ये सामाजिक समीकरण फारसे अनुकूल नसतानाही भाजपाच्या बाजूने गर्दी होती. त्यामुळे पक्षाच्या रणनीतीकारांचे मनोबल वाढले.

तसे तर उत्तर प्रदेशमध्ये केवळ विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होती, मात्र भाजपासाठी हा विजय अनेक दृष्टीने विशेष आहे. आजमगढ आणि रामपूर लोकसभा जागांनंतर आता विधानसभेच्या जागेवरही योगी सरकारच्या कारभारावर जनतेने कौल दिल्याचे दिसत आहे.

Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vinesh Phogat and Bajrang Punia joins congress
Vinesh Phogat Join Congress: विनेश फोगट, बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशामुळे सत्ताधारी भाजपाला धक्का; हरियाणात सत्तांतार होणार?
Vinesh Phogat and Bajrang Punia in Congress
Vinesh Phogat : विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात, कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
BJP rashtriya seva Sangh Co ordinator Constituency Upcoming Assembly Election
निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ
Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…

हेही वाचा – Bharat Jodo Yatra : “महाराष्ट्रातून जसे मोठे प्रकल्प गायब होताय, तसेच १५ लाखही गायब झाले”

प्रदेशाध्यक्ष म्हणून भूपेंद्रसिंह चौधरी आणि प्रदेश सरचिटणीस धर्मपाल सिंह यांच्या संघटनात्मक कौशल्याची ही परीक्षाच होती. प्रदेश सरचिटणीस धर्मपाल सिंह सातत्याने पन्ना समित्या गठीत करण्यापासून ते त्यांच्या सक्रियतेवर बारकाईन लक्ष ठेवून होते. प्रत्येक समितीमध्ये पाच जणांना ठेवण्यात आले होते. ज्यांची जबाबदारी ३०-३० मतांची होती.

भाजपाची जबरदस्त रणनीती –

या छोट्याशा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने जबरदस्त रणनीती आखली होती. यामध्ये सरकार आणि संघटनेत चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. परिणामी सामाजिक समीकरण फारसे भाजपासाठी अनुकूल नसतानाही, सुरुवातीपासून विरोधकांवर दबाव वाढत गेला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रॅली या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरली. या दरम्यान योगींनी जनतेशी थेट संवाद साधला, रॅलीतील प्रचंड गर्दीने निवडणुकीच्या निकालाचे खूप अगोदरच संकेत मिळाले होते.

हेही वाचा – लालूप्रसाद यादव यांना त्यांची मुलगी रोहिणी देणार स्वत:ची किडनी; वडील आणि मुलीच्या अतुट नात्याचा प्रत्यय!

भूपेंद्र चौधरी आणि धर्मपाल सिंह यांनी केला सतत प्रवास –

उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष भूपेंद्र सिंह आणि सरचिटणीस धर्मपाल सिंह यांनी सतत प्रवास करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. बूथस्तरापर्यंत नियोजन केले. याशिवाय सरकारमधील अनेक मंत्रीही त्या मतदारसंघात तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री द्वय केशवप्रसाद मौर्य आण ब्रजेश पाठक यांनीही सभा घेतल्या. या जागेवरील भाजपाचे उमेदवार अमन गिरी यांच्या जातीच्या मतदारांची संख्या फार जास्त नव्हती मात्र तरीही त्यांचा विजय झाला.