शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पनवेल, उरण परिसरातील वाढते नागरीकरण हे नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील नेतृत्व उदयानंतर भाजपच्या पथ्यावर पडल्याचे पहायला मिळते. या दोन्ही तालुक्यातील गावांलगत झालेल्या नागरीकरणामुळे या संपूर्ण पट्टयाला अलिकडच्या काळात निमशहरी असे रुप मिळाले आहे. ग्रामीण, शहरी आणि गावांना लागून असलेल्या भागाचे होत असलेले हे अर्धनागरीकरण प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या दोन्ही भाजप आमदारांसाठी सोयीचे ठरत असल्याचे चित्र असतानाच नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालांनी मात्र नव्या राजकीय समिकरणाची नांदी दिसली आहे.

शहरीकरणाच्या वेगात काहीसा लुप्त होऊ लागलेल्या शेतकरी कामगार पक्षाला पनवेल, उरण पट्टयातील उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांनी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील उरल्यासुरल्या शरद पवार यांच्या गटाविषयी ममत्व बाळगणाऱ्या मतदारांनी साथ दिल्याने भाजपला आगामी रायगड जिल्ह्यातील नवी मुंबईलगतचे हे तालुके वाटतात तितके सोपे नसल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले. उरण तालुक्यात काही महत्वाच्या गावांमध्ये तर आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी स्वत: मैदानात उतरले होते.

Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pramod Gharde Rebel Candidate, Pramod Gharde Welcome banner,
भाजप बंडखोराने लावले फडणवीसांचे स्वागत फलक, बावनकुळेंचेही छायाचित्र
Mahavikas Aghadi Protest March , Nagpur Winter Session , Mahavikas Aghadi Protest Nagpur,
Mahavikas Aghadi Protest March : ‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांनी विधानभवनात…
minister, BJP, raigad district, mahayuti government,
रायगडमध्ये भाजपची मंत्रीपदाची पाटी कोरी
Ganesh Naik , Ganesh Naik Navi mumbai,
भाजपच्या फुटीरांना स्वगृही परतण्याचे वेध, गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्याने घडामोडींना वेग
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे

हेही वाचा : बारामतीच्या रंगीत तालमीत अजित पवारांची सरशी

आसपासच्या गावांमधून गर्दी जमवून या दोघांनी जोरदार सभाही घेतल्या. निवडणुकीत जे काही लागते ते पुरवून विजयाचा मार्ग भक्कम झाला असे चित्रही या दोघा आमदारांच्या समर्थकांनी निर्माण केले होते. प्रत्यक्षात मात्र या आमदारांच्या ज्या गावांमध्ये सभा झाल्या तेथेच त्यांच्या समर्थकांना पराभवाचा धक्का बसल्याचे पहायला मिळाले.

महाविकास आघाडीचे आव्हान कायम

रायगड मधील पनवेल आणि उरण या दोन्ही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिल्यानंतर येथे शेकापला घरघर लागली. कर्नाळा बँक घोटाळ्यात ३० महिन्यापासून अटकेत असलेले माजी आमदार विवेक पाटील यांनी राजकीय संन्यास जाहीर केल्याने शेकापची या दोन्ही तालुक्यातील ताकद अधिक क्षीण झाली. पनवेल मतदारसंघात ठाकूर यांचे जेष्ठ चिरंजीव प्रशांत ठाकूर तर त्यांच्या पाठींब्याने महेश बालदी यांनी २०१९ अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकली आहे. ते अपक्ष असले तरी भाजपचे असल्याने या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या संपूर्ण पट्टयात भाजपचा बोलबाला असताना ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीने या आमदारांना धक्का दिला.

हेही वाचा : ओबीसी संघटनाही करणार न्यायालयीन संघर्ष

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला या निवडणुकीत यश मिळाल्याने विरोधकांचा विश्वास वाढला आहे. उरण विधानसभा मतदारसंघ हा उरण तालुका, पनवेल तालुक्यातील निम्मा भाग आणि खालापूर मधील दोन जिल्हा परिषदेचे मतदारसंघ असा आहे. यात उरण तालुक्यातील जवळपास १४ हजार मतदार असलेल्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यातील जासई आणि चिरनेर या दोन्ही ग्रामपंचायती आघाडीकडे यापूर्वीच होत्या तर दिघोडे ग्रामपंचायत आघाडीने भाजप कडून जिंकली आहे. याच मतदारसंघात भाजपची उरण पंचायत समितीची एकमेव जागा निवडून आली होती. तर पनवेल तालुक्यातील १७ पैकी ११ ग्रामपंचायती या शेकाप,काँग्रेस आणि शिवसेना(ठाकरे गट)यांनी जिंकल्या आहेत. भाजपने पाच आणि एक अपक्ष जिकला आहे. तर खालापूर मधील पाच पैकी पाच ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत.

शहरी आणि निमशहरी मतदार निर्णायक

पनवेल, उरण हा मतदारसंघ संघ ग्रामीण, निमशहरी आणि पूर्ण शहरी असा तीन भागात मोडतो. यातील उरण तालुका हा संपूर्ण शहराच्या मार्गावर आहे. यातील पश्चिम भाग हा औद्योगिक व नागरीकरणाने व्यापला आहे. येथील वाढत्या दळणवळणाच्या साधनांमुळे आणि व्यापणाऱ्या उद्योगांमुळे काही वर्षातच नवी मुंबईचा अविभाज्य परिसर बनतो आहे. तर पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायती निमशहरी किंबहुना मुंबई पुणे महामार्गामुळे मुंबई पुणे या राज्यातील दोन मुख्य शहरांच्या मध्यवरील ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पुणे ते रायगड यांना जोडणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा।भाग आहे. त्यामुळे या परिसरावर येत्या निवडणूकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात वर्चस्वाची जुगलबंदी पहावयास मिळेल. हेच ग्रामपंचायत निकालातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : चंद्रशेखर राव यांचा पक्ष सोलापुरात तेलुगू भाषकांपुरताच मर्यादित ?

“भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. २१ पैकी ८ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर अनेक ग्रामपंचायतीत अल्प मतांनी गमविल्या आहेत. मात्र त्यामुळे आमच्या मतांमध्ये वाढ झाली असून त्याचा फायदा पुढील निवडणूकीत होणार आहे”, असे भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार महेश बालदी यांनी म्हटले आहे.

Story img Loader