परभणी : अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अखेर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेऊन आपल्या गेल्या काही दिवसापासूनच्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात बाबाजानी यांची भेट घेऊन त्यांचा पाहुणचार घेतला होता. पाठोपाठ बाबाजानी समर्थकांचे शिष्टमंडळही जयंत पाटील यांना भेटले होते. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे बाबाजानी यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. कालच त्यांची विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत संपलेली आहे.

तब्बल चार दशकांपासून बाबाजानी हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतात. मधल्या काही महिन्यानंतर त्यांनी पुन्हा पवारांसोबतच जाण्याचा निर्णय घेतल्याने एका अर्थाने ही त्यांची घरवापसीच झाली आहे. निष्ठावंतांचा मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर आले असता त्यांनी पाथरी येथे जाऊन बाबाजानी यांची भेट घेतली. यानंतर परभणीत एक शिष्टमंडळ पाटील यांना दुसऱ्या दिवशी भेटले. महाविकास आघाडीत पाथरीची जागा राष्ट्रवादी पक्षास सोडवून घ्यावी आणि बाबाजानी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. दरम्यान पत्रकार बैठकीत बाबाजानी यांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असता ते मनाने आमच्याकडेच आहेत असे उत्तर त्यांनी दिले.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
maharashtra assembly election 2024 sharad pawars ncp fight in satara district
साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

हेही वाचा – कारण राजकारण : पवारांच्या बळाविना भुजबळ शक्तिहीन?

तसे बाबाजानी हे शरद पवारांचे जुने समर्थक आहेत. आपल्या राजकारणातला दीर्घकाळ त्यांनी पवारांच्याच नेतृत्वाखाली काम केले आहे. १९८० पासून ते पवारांसोबत आहेत. पवारांसोबत त्या वेळच्या एस. काँग्रेसमध्येही ते होते. चरख्याच्या चिन्हावर त्याकाळी मराठवाड्यात पाथरी, परतुर आणि उस्मानाबाद या तीन नगरपरिषदा निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून बाबाजानी यांनीच जबाबदारी पार पाडली होती. अगदी अलीकडेपर्यंत ते या पक्षाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष राहिले. स्वतः अल्पसंख्य समाजातून येत असले तरीही जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी मुख्य प्रवाहातलेच राजकारण केले आहे. पाथरी नगरपालिकेवर त्यांचे गेली अनेक दशके एकहाती वर्चस्व राहिले. पाथरी या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००४ ते २००९ या काळात प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दोन वेळा ते विधान परिषदेवर आमदार होते. २०१२ ते २०१८ या काळात परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि दुसऱ्यांदा ते २०१८ साली पुन्हा राष्ट्रवादीच्या कोट्यातून बिनविरोध आमदार झाले होते. अशाप्रकारे बाबाजानी यांना विधिमंडळात तीन वेळा संधी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावरही त्यांनी काम केले आहे. आता मात्र त्यांच्या डोक्यात पाथरी विधानसभेची गणिते आहेत.

पाथरीच्या ग्रामीण भागातही त्यांची कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. स्थानिक विरोधक असलेले सईद खान हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात असल्याने त्यांच्याकडून बाबाजानी यांची कोंडी होत होती, पाथरी शहर व ग्रामीण भागात विविध विकास कामांसाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाने मोठा निधी ओतला. बाबाजानी यांचे ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते सईद खान यांच्यासोबत निघून गेले. अनेक महिन्यांपासून कोणता पर्याय निवडावा याबाबत बाबाजानी यांची द्विधा मनस्थिती दिसून येत होती. त्यामुळे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीत राहण्यापेक्षा सत्ताधारी अजित पवार गटात राहण्याचा निर्णय बाबाजानी यांनी घेतला. या गटात आल्यानंतर त्यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीही झाली.

हेही वाच – तिरकी टोपी आणि पायघोळ धोतर…!

वस्तुतः पक्षफुटीनंतर आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते मात्र विरोधकांकडून कोंडी होत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ‘कुछ तो मजबूरीया रही होगी, वरना युही कोई बेवफा नही होता’ असा शेर त्यांनी शरद पवारांसमोर ऐकवला. तरीही पक्ष सोडताना आपली कोणतीही मजबुरी नव्हती असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत बाबाजानी यांनी अलिप्तता स्वीकारल्याने पक्षनेतृत्व आणि त्यांच्यात अंतर पडत गेले. बाबाजानी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच त्यांचे आणखी एक स्थानिक विरोधक राजेश विटेकर यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली त्यामुळेही बाबाजानी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटात अस्वस्थ होते.

पाथरी विधानसभा लढण्याची इच्छा

१९८० पासून आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाची सुरुवात केली. फुले- शाहू- आंबेडकर विचारसरणीतून सातत्याने धर्मनिरपेक्ष राजकारण केले. राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आहे. मतदार व कार्यकर्ते त्यामुळे सातत्याने अस्वस्थ होते. पक्ष म्हणून वेगळी भूमिका घ्यावी पण भारतीय जनता पक्षासोबत नको असे आमच्या समर्थकांचे व मतदारांचे म्हणणे होते. लोकसभा निवडणुकीत हा अनुभव आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाताना कोणतीही अट घातलेली नाही. दोन वेळा विधान परिषदेवर आमदार होतो, त्यामुळे आता विधान परिषदेचीही महत्त्वाकांक्षा नाही. पक्षाने संधी दिली तर पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढवीन. – बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार