परभणी : मराठा आरक्षण आंदोलनानंतर झालेले ध्रुवीकरण लक्षात घेता परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा मतांची विभागणी करण्यावर महायुतीच्या बाजूने लक्ष केंद्रित केले जात असून मतदारसंघातील सर्व मराठा मते एका दिशेने जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः मराठा तरुण आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या तरुणांचा रोष एकवटला तर महायुतीला मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका बसू शकतो. हा सर्व विचार करून मराठा मते विभाजित करण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काय डावपेच केले जाऊ शकतात, हेही हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजघटकांची मते आपापल्या ठिकाणी एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विरोधात पर्यायानेच महायुतीच्या विरोधात मराठा समाजाची मते जाऊ शकतात. निवडणुकीच्या काळात जसजशी प्रचाराची धार तीव्र होत जाईल तसतसे मराठा व ओबीसी मतांचे ध्रुवीकरण वेगाने होत जाईल. सध्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना प्रचारात हे जाणवू लागले आहे. ओबीसी मते महायुतीच्या बाजूने तर मराठा मते महाविकास आघाडीच्या बाजूने जातील अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्या अनुषंगाने आपापली मतपेढी सांभाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहे.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!

हेही वाचा…शरद पवार विरुद्ध विखे संघर्षाची परंपरा लोकसभा निवडणुकीतही कायम

एकगठ्ठा मराठा मते जर महाविकास आघाडीकडे गेली तर मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या मतांची विभागणी कशी करता येईल याचा विचार महायुतीच्या अगदी वरिष्ठ पातळीवरच्या नेतृत्वापासून केला जात आहे. रिंगणात काही चर्चित मराठा चेहरे असायला हवेत याचीही आखणी केली जात आहे. मराठा मतांचे विभाजन झाले तर निवडणूक सोपी जाईल अशी व्यूहरचना भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी गट व एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट हे तिन्ही पक्ष करू लागले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार करू जाता मराठा आंदोलनात असलेले सुभाष जावळे, हवामान अभ्यासक पंजाब डख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, माजी मंत्री गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर हे काही परिचित मराठा चेहरे सध्या उमेदवारांच्या यादीत आहेत.

वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळावी म्हणून पंजाब डख यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या समीर दुधगावकर यांनी केवळ वंचितचा पाठिंबा हवा, अशी अपेक्षा वंचितच्या नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. माजी मंत्री गणेश दुधगावकर यांच्यासह काही समर्थकांबरोबर जाऊन समीर हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भेटले होते तथापि आंबेडकर यांनी या बाबीस नकार दिला. अपक्ष म्हणून असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी वंचितचा स्वतंत्रपणे उमेदवार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विशेष म्हणजे दुधगावकर व डख या दोघांच्याही भेटी झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाबासाहेब उगले या सर्वस्वी नवख्या चेहऱ्याची उमेदवारी घोषित केली. मात्र, ही उमेदवारी रद्द ठरवून डख यांना ऐनवेळी वंचितची उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा…LS Election 2024: “लोकशाहीसाठी ‘जिंका वा मरा’ अशी निवडणूक”, मोदी सरकार विरोधात स्टॅलिन यांचे रणशिंग!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांचे आंतरवाली सराटी हे गाव घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येते. हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. आपला कोणताही अपक्ष उमेदवार असणार नाही आणि कोणालाही आपला पाठिंबा नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तरीही परभणी लोकसभा मतदारसंघात काही इच्छुक उमेदवार त्यांच्या नावाचा हवाला देत आहेत. काही उमेदवारांनी आपल्याला मराठा संघटनांचा पाठिंबा आहे असे घोषित केले आहे. मराठा मतपेढी विस्कळीत करण्याच्या दृष्टिकोनातून काहींची उमेदवारी असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (आहे. परिचित असलेल्या या उमेदवारांसह आणखीही काही मराठा उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. यापैकी कितीजण माघार घेतात आणि किती जण रिंगणात राहतात याबाबत उत्सुकता आहे.