छत्रपती संभाजीनगर : परळी विधानसभा मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रचाराला महानगरांमधून सुरुवात करताना शिक्षणासाठी आलेल्या बहुजन विद्यार्थी नवमतदार वर्गावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुण्यानंतर मंगळवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एका मोठ्या हाॅटेलच्या हिरवळीवर विद्यार्थी केंद्रीत कौटुंबीक स्नेह मेळावा घेत बहुजन तरुणांना भावनिक साद घालण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी थेट जरी नसला तरी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्याकडून ‘छोट्या जाती’तला उमेदवार म्हणून केलेल्या टीकेला उत्तर देण्यास सुरुवात केली. सोबतच खुद्द शरद पवार यांनीच ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या पुस्तकातून आपल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कामावर एक परिच्छेद लिहून उल्लेख केल्याचेही धनंजय मुंडे यांनी आवर्जून सांगितले. पवार यांनी आपल्याभोवती परळी विधानसभा मतदार संघात चक्रव्यूह रचले आहे. त्यांच्याकडून ‘छोट्या जाती’तील अर्थात बहुजन नेतृत्व संपवण्याचे प्रयत्न सुरू असून ते लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यातलाच एक भाग हाेता. मात्र, आता बहुजन तरुणांनी साथ दिली तर चक्रव्यूह भेदून दाखवू आणि पंकजा मुंडे यांचा जिव्हारी लागलेल्या पराभवाचाही हिशेब चुकता करू, असे भावनेला हात घालणारे भाषण धनंजय मुंडे यांनी मेळाव्यात केले.

हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

धनंजय मुंडे येथील कार्यकर्ते तथा विद्यापीठाच्या परिषदेवरील सदस्य ॲड. दत्ता भांगे यांनी मेळाव्याची जुळवा-जु‌ळव करताना बहुजन तरुण विद्यार्थ्यांना एकत्र आणले होते. शिवाय परळी, बीड जिल्ह्यावासियांना एकत्र आणून कौटुंबीक स्नेह मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्यासोबतच पंकजा मुंडे यांचेही उंचीपुरे छायाचित्रांचे राहतील, याची खास काळजी घेतलेली होती. मात्र, या मेळाव्याकडे पंकजा मुंडे यांच्या अनेक समर्थकांनी पाठ फिरवली होती. बहुजन विद्यार्थी मेळावा, असे थेट उल्लेख केला जात नसला तरी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठा, दलित, आेबीसी समाजातील नेत्यांनाही आवर्जून स्थान देण्यात आले.